

पूर्णा : पूर्णा शहरातील हरिनगर भागात राहणाऱ्या एका साडेसतरा वर्षीय युवतीला अज्ञात भामट्याने फुस लावून पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती असी की, शहरातील हरीनगर येथे राहणाऱ्या कुटुंबातील एक साडेसतरा वर्षाची अल्पवयीन युवती २२ एप्रिलरोजी रात्री आपल्या घरात झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.
दरम्यान, तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी तिचा इतरत्र शोध घेतला. परंतु ती आढळून आली नाही. ही मुलगी सतरा ते साडे सतरा वयाची असून ती इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. गोरा वर्ण, मध्यम बांधा, साडेपाच फूट उंची, अंगात पांढऱ्या काळ्या रंगाचे टी शर्ट, काळ्या कलरची नाईट पॅन्ट, पायात पांढरा बुट व मराठी भाषा, अशा वर्णनाची मुलगी कुठे दिसून आल्यास तत्काळ पूर्णा पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केले आहे. या प्रकरणी पळवून नेणाऱ्या अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रेखा शहारे करत आहेत.