Parbhani News : टँकरच्या धडकेत १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, दिवाळी सुट्टीत आला होता आजोळी

रस्त्याच्या कामासाठी पाणी टाकणाऱ्या ट्रॅक्टरच्या टँकरची धडक
Parbhani News
Parbhani News : टँकरच्या धडकेत १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, दिवाळी सुट्टीत आला होता आजोळीfile photo
Published on: 
Updated on: 

12-year-old boy dies on the spot after being hit by a tanker

मानवत : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आजोळी आलेल्या अवघ्या १२ वर्षीय बालकाचा रस्त्याच्या कामासाठी पाणी टाकणाऱ्या ट्रॅक्टरच्या टँकरची धडक बसून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मानवत तालुक्यातील कुंभारी येथे घडली. शिवम सुनील राठोड (रा. मोगरा, ता. माजलगाव) असे मृत बालकाचे नाव असून, अपघातात सहभागी ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच २२ बीसी ३२०४ असल्याची माहिती आहे.

Parbhani News
CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदींकडून कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी येथे रस्त्याचे काम सुरू असून, या कामासाठी पाणी टाकण्याकरिता ट्रॅक्टरला टँकर जोडण्यात आला होता. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा टँकर जात असताना शिवमला त्याची धडक बसली. धडक गंभीर असल्याने शिवमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी तो आपल्या आजोळी कुंभारी येथे आला होता. मात्र, सणाच्या आनंदात या बालकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवमचे आई-वडील ऊसतोड मजूर असून, ऊसतोडणीसाठी ते कर्नाटकातील एका साखर कारखान्यावर गेल्याची माहिती आहे. आई-वडील रोजगारासाठी परगावी असताना त्यांच्या चिमुकल्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर शिवमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, नातेवाइकांकडून तक्रार नसल्याने शवविच्छेदन करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

Parbhani News
Sunny Deol Fitness : वयाच्या ६९ व्या वर्षीही सनी देओल फिट अन् तंदुरुस्त! फिटनेससाठी पाळतात ३ सोप्या सवयी

रस्त्याच्या कामावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्याचे काम सुरू असताना पाणी टाकणाऱ्या टँकरच्या वाहतुकीदरम्यान आवश्यक खबरदारी घेतली जात होती का, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय होते का, असे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याने रस्त्याच्या कामादरम्यान नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.