परभणी: गॅस सिलिंडर स्फोटातील नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला खासदार धावले

परभणी: गॅस सिलिंडर स्फोटातील नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला खासदार धावले

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील धनगरमोहा येथील अल्पभूधारक शेतकरी पाराजी तरडे यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी तातडीने भेट देत कुटुंबीयांना आधार देत आर्थिक मदत केली.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील धनगरमोहा येथील शेतकरी पाराजी तरडे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील कपडे, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेने तरडे कुटुंबीय अक्षरशः रस्त्यावर आल्याने हतबल झाले होते. खासदार संजय जाधव यांना या घटनेचे वृत्त कळताच शुक्रवारी त्यांनी तातडीने धनगरमोहा येथील पाराजी तरडे यांच्या कुटुंबीयांना भेट देत आधार दिला.
तसेच रोख आर्थिक मदत करून त्यांना तातडीचा दिलासा दिला. खासदार संजय जाधव यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख जितेश गोरे, उपतालुका प्रमुख सुभाष देशमुख, गोविंद अय्या, माऊली व्हावले आदीसह धनगरमोहा ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news