परभणी : कर्कश आवाजातील सवारी करणाऱ्या बुलेटराजांवर कारवाईचा बगडा

परभणी : कर्कश आवाजातील सवारी करणाऱ्या बुलेटराजांवर कारवाईचा बगडा
Published on
Updated on

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मंदिर, मस्जिद, शाळा, महाविद्यालय, दवाखान्यासह त्रास होईल, अशा सार्वजनिक ठिकाणाहून बुलेट चालवून कर्कश आवाजाचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर चारठाणा पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत असून त्याच्या आवाजाचे यंत्रच काढून घेण्यात येत आहे. तसेच विनापरवाना व अल्पवयीन वाहन चालवताना आढल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चारठाणा शहरातील मुख्य रोडवरच शाळा, कॉलेज, दवाखाने, पोलीस ठाण्यासह सार्वजनिक ठिकाण व धार्मिक स्थळे आहेत. चारठाणा शहरातून १० ते १५ बुलेटस्वार येऊन कर्कश आवाज काढत गावातून भरधाव वेगाने पळवित असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी अशा वाहणावर कार्यवाही करत त्याचे सायलेंसर यंत्र काढून घेण्यात येत आहे. तर विनापरवाना गाडी चालवल्यास, अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यासही प्रतिबंधात्मक कार्यवाही स. पोलीस निरिक्षण बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.का.विष्णुदास गरुड यांच्या कडून करण्यात येत आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news