पैठण ; पुढारी वृत्तसेवा पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी, बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत १८ संचालक निवडण्यासाठी मतमोजणी पूर्ण होणार आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल, सपोनी लक्ष्मण केंद्रे, प्रल्हाद मुंडे, जनाबाई सांगळे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, संदीप जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाल्यावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू नाना भुमरे यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद तांबे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांची मतदान मोजणी केंद्रावर उपस्थिती लावली. मतमोजणी केंद्राबाहेर पालकमंत्री संदिपान भुमरे व महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत.
हेही वाचा :