पैठण : शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला करून १६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत

paithan news
paithan news
Published on
Updated on

पैठण – पुढारी वृत्तसेवा: शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकारी व कर्मचाऱ्यावर हल्ला करून सोळा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाचोड पोलीस पथकाने मध्यप्रदेश येथून सापळा रचून अटक केली आहे.

पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या फरार आरोपीची शोधमोहीम जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलीय.

बुधवारी दि.२४ रोजी सपोनि संतोष माने यांनी सोळा वर्षांपूर्वी शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण केली होती. त्यानंतर तो फरार झाला. आरोपी मध्यप्रदेशमध्ये पोलिसांची नजर चुकावून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याची खबर प्राप्त झाल्यामुळे पाचोड पोलीस पोना अंबेकर, चव्हाण, पाटेकर यांच्या पथकाने मध्यप्रदेश येथील जामण्या पाणी तानस्मल जि. बडवाणी परिसरात वास्तव्य असलेल्या रेकॉर्डवरील फरार भाऊसिंग डुका वास्कले उर्फ मानठाकूर या आरोपीला सापळा लावून अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news