पाचोड : चॅाकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार

File Photo
File Photo
Published on
Updated on

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवकाने चॅाकलेटचे आमिष दाखवत सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार  केल्याची धकादायक घटना घडली. पैठण तालुक्यातील पाचोड खूर्द येथे रविवारी (ता.२९) दुपारी चार वाजताच्या सुमारास  उघडकीस आलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.  दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला तातडीने ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, पाचोड खूर्द येथे आरोपीचे गावात किराणा दुकान आहे. पीडित मुलगी दुपारच्या वेळी या दुकानात चॅाकलेट-गोळ्या घेण्यासाठी गेली. या दरम्यान आरोपीने चॅाकलेटचे आमिष दाखवत त्या अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले. किराणा दुकानाच्या पाठिमागे असणाऱ्या घरात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. दरम्यान ती चिमुकली रडत घरी गेली. भेदरलेल्या अवस्थेत मुलगी का रडत आहे, आईने तीला विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी ती घाबरली असल्यामुळे तीला काही सांगता येत नव्हते. यावेळी मुलीच्या आईने तिच्या गुप्तांगाची पाहणी केली असता त्या जागेतून रक्त पडत असल्याचे दिसले. काही तरी विपरीत घटना घडल्याचे दिसते म्हणून थोड्या वेळात पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार आई व चुलतीला सांगितला. त्या दोघींनी ऐकून एकप्रकारे धक्काच बसला. मुलीच्या आईवडिलांनी लगेच पाचोड पोलिस ठाणे गाठून सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहीती दिली.

पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, उपनिरिक्षक सुरेश माळी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस सहाय्यक अधीक्षक पवन बन्सोड, पोलिस उपविभागीय अधिकारी डाँ.विशाल नेहूल यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे हे करीत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news