Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : नेहमीप्रमाणे माॅर्निग वाॅकसाठी घरातून बाहेर पडलेल्या एकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident) जागीच मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथे गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र तुकाराम लोंखडे ( ४७ ) असे मृताचे नाव आहे.

घाटापिंपरी येथील राजेंद्र तुकाराम लोंखडे हे चालक आहेत. ते रोजच्या सवयीप्रमाणे गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. बीड – धामणगाव- नगर राज्य महामार्गावर चालत जात असताना नगरहून येणार्‍या एका भरधाव वाहनाने लोखंडे यांना जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यावर व्यायाम करताना काळजी घ्या

पहाटे अचानक चालकाला झोपेची डुलकी येऊ शकते. एक डुलकी रस्त्यावरील नागरिकांचे आयुष्य संपवू शकते. यामुळे माॅर्निग वाॅक किंवा व्यायामासाठी रस्त्यावर जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news