

केज: पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून आज (दि.२०) पुन्हा केज-बीड रोडवर मस्साजोग येथे एसटी बसने मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात पांडुरंग बोंदर (वय ६०, रा, देवधानोरा, ता. कळंब) जखमी झाले.
याबाबतची माहिती अशी की, आज दुपारी २:३० च्या सुमारास पांडुरंग बोंदर सांगवी (सारणी) येथून मुलीला भेटून मोटार सायकलवरून (एमएच-२५/एक्स- ७९४४) केजकडे निघाले होते. मस्साजोग जवळील उत्तरेश्वर पिंपरी फाट्यावर त्यांना पाठीमागून येणाऱ्या नांदेड आगाराच्या पुणे-नांदेड एसटी बसने (एम एच-२०/जी सी-३२०१) जोराची धडक दिली. यात पांडुरंग बोंदर जखमी झाले. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.
या प्रकरणी एसटी बसचा चालक नामदेव डांगे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा