

सेनगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवू. त्याचबरोबर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येईल, असा विश्वास वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला. शरद युवा संवाद यात्रेनिमित्त शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर व्ही. के. देशमुख मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. युवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शेख महबूब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शेख महबूब यांनी इंधन दरवाढ, विजेचा प्रश्न, महागाई, यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून हल्ला चढवला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष चंदन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पतंगे, नवनिर्वाचित युवा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, संजय दराडे, रवी गडदे, परमेश्वर इगोले, तालुका अध्यक्ष वैशाली वाघ, अमोल मोरे, नगरसेवक सतीष देशमुख उपजिल्हा अध्यक्ष सदिप देशमुख , तालुका अध्यक्ष देविदास गाडे, नगरसेवक कैलास देशमुख, शहर अध्यक्ष सत्यम देशमुख, नगरसेवक सदिप बहीरे आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?