

हिमायतनगर : तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्यांने रविवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविलेची घटना घडली आहे. सदरील शेतकऱ्याला उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकरी अतुल रमेश जाधव (वय 30) हे रविवारी शेतामध्ये दिवसभर काम करून घरी आले आले होते. गेले अनेक वर्षापासून शेती कर्ज व इतर कर्जाचा बोजा कधी फिटणार या विवंचनेत राहून सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या कर्जापाई या तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविलेची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.
औषध प्राशन केल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी सदरील शेतकऱ्यांस भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डाक्टरांनी सांगितले आहे. सदरील शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील ,पत्नी ,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे त्याच्यावर रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सदरील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्याची मागणी कोका नाईकतांडा येथील नागरिकांनी केली आहे. या घटनेची भोकर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.