

Yelkot Yelkot Jai Malhar! The Malegaon fair begins with great fanfare.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : येळकोट येळकोट जय मल्हार असा जय घोषासह बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदाही माळेगावच्या श्रीखंडोबा यात्रेस सुरवात झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानक-यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी मानक-यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भोसीकर (पानभोसी), गोविंदराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग पाटील (माळेगाव), मल्हारी पाटील (माळेगाव), विजयकुमार कनकंदडे, अंबादास जहागीरदार या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने जोडआहेर, मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.