

Painganga Wildlife Sanctuary
प्रशांत भागवत
उमरखेड : (यवतमाळ) : वैशाख वनव्याने एकीकडे जंगले निष्पर्ण झाली आहेत. तर दुसरीकडे याच निष्पर्ण जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री (दि. १ ) पडणाऱ्या लख्ख चांदण्यात प्राणी गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी पर्यटकांनाही मचाणीवर बसून निसर्ग अनुभव घेत आहेत. त्यासाठी वनविभागाने यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा आणी टिपेश्वर या दोन्ही अभयारण्यात खास तयारीही केली आहे.
शुक्रवारी १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. कडक उन्हामुळे बोडख्या झालेल्या जंगलात प्राणी सहज दिसू शकतात. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणीगणना केली जाणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या वनप्रेमींसाठी पांढरकवडा वन्यजीव विभागाने 'निसर्ग अनुभव' उपक्रमाचे आयोजन केले आहे. निसर्गप्रेमींना वन्यप्राण्यांचे जवळून दर्शन घेता यावे, तसेच वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी आणि प्राणीगणनाही करावी, या उद्देशाने शुक्रवारी व शनिवारी कालावधीत हा उपक्रम राबविला जात आहे.
त्यासाठी दोन्ही अभयारण्याच्या क्षेत्रात एकंदर ४७ मचाणींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील २५ मचाणी टिपेश्वरमध्ये तर २२ मचाणी पैनगंगा अभयारण्यात आहेत. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या पर्यटकांना १ मे रोजी दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण तसेच २ मे रोजी सकाळचा नाश्ता, पिण्याचे पाणी वन विभागातर्फे पुरविले जाणार आहे.
या निसर्ग अनुभवादरम्यान टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेता येणार आहे. सद्यस्थितीत टिपेश्वर अभयारण्यात २२ वाघ (प्रौढ व बछडे), ११ बिबट, अस्वल, रानकुत्रे, लांडगा, रानडुक्कर यासह चांदी अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, हरण, चौशिंगा, काळविट व मोर यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे. निसर्गप्रेमींना थेट पाणवठ्यजवळील मचाणीवर बसून रात्रभर वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. निसर्गाशी नाते जोडण्या आणि वन्यजीव व्यवस्थापन लोकसहभाग वाढविण्यावर यावेळी वनविभागातर्फे प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय वनअधिकारी उत्तम फड यांनी दिली.
प्राणीगणना करण्यासाठी टिपेश्वर व पैनगंगा या दोन्ही अभयारण्य मचाणींची व्यवस्था आहे. टिपेश्वरमध्ये २५ आणि पैनग अभयारण्यात २२ मचाणी आहेत. प्राणी जिथे हमखास पा पिण्यासाठी येतील, अशा पाणवठ्यांजवळ या मचाणी आहे त्यामुळे निसर्गप्रेमींना मचाणीवर बसून रात्रीच्या चांदण्यात प्रा पाहण्याची संधी मिळणार आहे.