पुढारी वृत्तसेवा
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री “निसर्ग अनुभव कार्यक्रम”ही आयोजित केला जातो. वनाधिकारी, कर्मचारी आणि निसर्गप्रेमी सहभागी होतात
'वॉटर होल सिटिंग' म्हणजे पूर्णतः निरीक्षणावर आधारित आहे. वन कर्मचारी, पर्यटक, स्वयंसेवक आणि अधिकारी पाणवठ्यांजवळ बसून रात्री प्राण्यांची नोंद करतात
पाण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची संख्या, प्रजाती, वेळ आणि वर्तन यांची अचूक माहिती नोंदवली जाते
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता – सर्व प्राणी पाणवठ्यांवर येतात, त्यामुळे निरीक्षण सोपे होते
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रप्रकाशात सर्व प्रजातींची माहिती, वाघ, बिबट्या, अस्वल, हरणे, रानडुक्कर, लांडगे यांचा पूर्ण डेटा मिळतो
वन्यजीव व्यवस्थापनास मदत – घनता, हालचाल आणि पर्यावरणीय साखळी समजते. जनसहभाग वाढतो, स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमींचा सहभाग वाढतो
पूर्वी ही प्रक्रिया पूर्णतः मानवी निरीक्षणावर आधारित होती. आता मात्र GPS, GIS, कॅमेरा ट्रॅप, डिजिटल नोंदी याचा वापर वाढलेला आहे.
संवेदनशील भागात पेट्रोलिंग वाढवून शिकारी रोखणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, गावांमध्ये अलर्ट सिस्टम, कुंपण आणि जनजागृती कार्यक्रम राबवणे
जंगलात रात्रीत पाणवठ्याजवळ बसून केलेली ही गणना केवळ आकडेवारी नसून निसर्गाशी जोडणारा आणि संवर्धनाची जाणीव करून देणारी अनुभूती ठरते