Nanded News: भारीच! गोवा-नांदेड-बंगळुरू विमान मार्गाने जोडणार, या एअरलाईन्सने दिला प्रस्ताव

जुलैअखेरपर्यंत होऊ शकते सेवा सुरू
Fly 91 Airlines
Fly 91 AirlinesPudhari
Published on
Updated on

'Fly91' proposes to start Goa-Nanded-Bengaluru flight service

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : रिबंदर-गोवा येथील वय वर्षे जेमतेम दोन असलेली फ्लाय ९१ ही विमान कंपनी गोवा-नांदेड-बंगळुरू या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुक आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे एक पथक नांदेड येथे येऊन गेले. तसा प्रस्ताव सदर कंपनीने दिला असून विनाअडथळा तो मंजूर झाल्यास जुलैअखेर वरील मार्गावर सेवा सुरू होऊ शकते. दरम्यान, नांदेड विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पावसाळ्यामुळे रखडल्याचे समजले.

Fly 91 Airlines
Nanded News : एक चव्हाण पाहणी करून गेले; दुसरे आज येणार !

गतवर्षी १ एप्रिलपासून नांदेड विमानतळ पुन्हा कार्यान्वित झाले. उडान योजनेंतर्गत हैदराबाद, अहमदाबाद, भूज, हिंडन (दिल्ली), जालंधर, बंगळुरू या शहरांना स्टार जेट या कंपनीच्या हवाई सेवेने जोडण्यात आले आहे. कालांतराने याच कंपनीने पुणे व नागपूर येथेही सेवा सुरू केली होती; परंतु नागपूर सेवा बंद पडली आहे. पुण्यासाठी मात्र प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. वास्तविक पाहता सर्वच मार्गावर प्रवासी प्रतिसाद उत्तम असून दिल्लीसाठी तर एक फेरी कमी पडते आहे. कारण स्टार जेट ही कंपनीसुद्धा नवीन असून ७२ आसन क्षमतेचे हे क्राफ्ट आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्येच फ्लाय ९१ ही कंपनी नांदेड-गोवा या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुक होती. परंतु त्यावेळी ते शक्य झाले नाही. आता कंपनी २०२४ मध्ये स्थापन झाली आहे. या कंपनीकडे एटीआर ७२ या पद्धतीचे ३ विमाने आहेत. हर्ष राघवन हे संस्थापक अध्यक्ष असून मनोज चाको हे सीईओ आहेत. १८ मार्च २०२४ रोजी या कंपनीने सिंधुदुर्ग, बंगळुरू आणि हैदराबाद येथे सेवा सुरू केली. तर एप्रिल २०२४मध्ये लक्षद्वीप आणि जळगाव या शहरांना जोडले आहे. त्याचवेळी नांदेड रांगेत होते. पण, आता कंपनीने प्रत्यक्ष हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने कंपनीची एक टीम मागील आठवड्यात नांदेड विमानतळावर येऊन गेल्याचे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Fly 91 Airlines
Nanded : करणीच्या संशयातून शेतकऱ्यावर हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

नांदेड विमानतळावरील धावपट्टीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. धावपट्टीची स्थिती चांगली नसल्याने गतवर्षी स्टार जेटसाठी लवकर परवानगी मिळत नव्हती. परंतु नंतर ती देण्यात आली. धावपट्टी दुरुस्त करावी लागणार यासाठी पुन्हा पुन्हा सांगण्यात आले. पण त्यावेळी रिलायन्सने त्याकडे दुर्लक्ष केले. मागील महिन्यात एमआयडीसीने हे विमानतळ रिलायन्सकडून परत घेत एमएडीसी या शासन अंगीकृत संस्थेकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धावपट्टी नूतनीकरण व अन्य कामे झाल्यानंतर एमएडीसी विमानतळाचा ताबा घेईल. त्यानंतर नांदेड-मुंबई या मार्गावर सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, सध्या पावसामुळे धावपट्टी नूतनीकरणाचे काम सुरू करता आले नाही, असे समजले.

मुंबईची प्रतीक्षा कायमच नवी मुंबई येथील विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नांदेड-मुंबई या लोकप्रिय व बहुप्रतीक्षित मार्गावर सेवा केव्हा सुरू होते, याबाबत उत्सुकता आहे. त्यासाठी विविध स्तरावरून पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. पण, आता गोवा आणि बंगळुरू या मार्गावर फ्लाय ९१ या कंपनीचे स्वागत करण्यात येत आहे. खा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर वरील माहिती शेअर करीत या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्टार जेट मागील वर्षापासून बंगळुरू येथे सेवा देते आहे. पण आता गोवा हे आणखी एक पर्यटनस्थळ हवाई मार्ग नांदेडशी जोडले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news