

Unprecedented response from devotees to Kavad Yatra
नायगाव, पुढारी वृत्तसेवा श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर हर हर महादेव च्या जयघोषात भक्तिमय उत्साहात काढण्यात आलेल्या नृसिंह मंदिर श्रीक्षेत्र राहेर ते सिद्धेश्वर महादेव मंदिर नरसी या कावड यात्रेला नरसी व पंचक्रोशीतील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या तीन वर्षांपासून कावड यात्रेच्या महाप्रसादाचे मानकरी अस-लेले माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी यावर्षी देखील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे भव्य आयोजन केले होते. नरसी नगरीचे धार्मिक वैभव उंचावणार्या श्रीक्षेत्र राहेर ते नरसी कावड यात्रा सोहळ्यात प्रतिवर्षी शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत असून यावर्षी महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
बुधवारी भल्या पहाटे श्रीक्षेत्र राहेर येथील ऐतिहासिक हेमाडपंथी नृसिंह मंदिर व पवित्र गोदापात्रात महाआरती करून गोदामातेची मनोभावे पूजन करण्यात आले. या कावड यात्रेत संदीप महाराज जोशी, रामकिसन महाराज राजलवाड, श्रावण पाटील भिलवंडे, राजेश भिलवंडे, साईनाथ आक्कमवाड, बालाजी चिंतावार, गोविंद नरसीकर, सुभाष पेरकेवार, कैलास तेलंग, श्रीनिवास आक्कमवाड यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले होते.