Nanded News : म्हैस गेली जीवानिशी; अख्या गावालाच टोचल्या लसी

सावधगिरी म्हणून आरोग्य विभागाने पुरवले 'अँटी रेबीज'
Nanded News
Nanded News : म्हैस गेली जीवानिशी; अख्या गावालाच टोचल्या लसीFile Photo
Published on
Updated on

The buffalo died and the entire village was vaccinated

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बिल्लाळी (ता. मुखेड) येथील एक दुभती म्हैस (दि. ४ रोजी) रेबीजसहश आजार झाल्याने मरण पावली होती. दरम्यान या म्हशीला कोणते कुत्रे चावले हे कोणालाच माहिती नाही, परंतु तिचे दूध मात्र बिल्लाळीकर ग्रामस्थांनी प्यायले होते. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे सावधगिरी म्हणून सर्व गावानेच अँटी रेबीज लस टोचून घेतली.

Nanded News
Nanded Rain | 'शेलगाव'चा तिसऱ्यांदा संपर्क तुटला! : ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशीच भावा-बहिणींची ताटातूट

बिल्लाळी गावातील किशन इंगळे यांची दुभती म्हैस सुमारे महिन्यांपासून आजारी होती; परंतु ती नित्यनेमाने दूध देत असे. इंगळे यांच्या घरून अनेक ग्रामस्थ दूध घेऊन जात होते. म्हशीचे आजारपण दूर होत नसल्याने जवळ असलेल्या जाहूर (ता. मुखेड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे तपासणी अंती रेबीजसदृश आजाराचे निदान झाले. त्यामुळे म्हैस चरत असताना पिसाळला कुत्रा चावला असावा, असा तर्क लावण्यात आला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

कुत्र्याचे काय? दरम्यान एवढा सगळा गोंधळ उडवून देणाऱ्या कुत्र्याचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. कोणी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पाहिले नाही किंवा तो कुत्रा म्हशीला चावताना कोणी पाहिले नाही. म्हशीच्या शरीरावर जखम होती का नाही, याबद्दलही माहिती मिळू शकली नाही; परंतु या घटनेने गावातील कुत्री मात्र संशयाच्या भोवऱ्यात आले.

Nanded News
Nanded News | सहस्त्रकुंड प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; सिरपल्ली येथे ४० गावांतील शेतकऱ्यांची भव्य सभा

लसीसाठी ग्रामस्थांची धाव

कालपर्यंत सुमारे १८० जणांनी लस टोचून घेतली. उपकेंद्रात आदल्या दिवशी ३१ जणांनी, दुसऱ्या दिवशी ९० जणांनी लस घेतली. राजुरा येथे ३० जण तर बार्हाळी येथे १९ जणांनी लस घेतली. उर्वरित लोक अजूनही लस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news