Nanded News : जिल्हा बँक निवडणुकीत दोन ठिकाणी अनपेक्षित निकाल ?

आज मतमोजणी : दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार
Nanded News
Nanded News : जिल्हा बँक निवडणुकीत दोन ठिकाणी अनपेक्षित निकाल ?file photo
Published on
Updated on

Unexpected results in two locations during the District Bank elections?

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सुमारे २६ टक्के मतदान झाल्यानंतर मंगळवारी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी नांदेड आणि देगलूर या दोन तालुक्यांच्या जागांवर अनपेक्षित निकाल लागण्याचा अंदाज समोर आला आहे.

Nanded News
Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपींच्या पथकाचा छापा

बँकेच्या संचालकपदी ११ जण बिनविरोध निवडून आल्यानंतर 'अ' मतदारसंघातील ९ आणि जिल्हास्तरीय ३ अशा १२ जागांसाठी जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर रविवारी दिवसभरात मतदान घेण्यात आले. अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर येथील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदानाची नोंद झाली; पण मुखेड, लोहा आणि नांदेड येथील केंद्रांवर अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याचे दिसून आले.

भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी इतरपक्षीय नेत्यांना एकत्र आणून ही निवडणूक शत-प्रतिशत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तो प्रस्थापितांपुरताच मर्यादित राहिला. त्यातून जिल्ह्यातील तीन आमदार, काही आजी-माजी नेत्यांचे आप्त तसेच एका विद्यमान व एका माजी आमदाराची पत्नी असे ११ जणं बिनविरोध आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी इतर जागांवर निश्चित केलेल्या उमेदवारांना निवडणुकीस सामोरे जावे लागले.

या उमेदवारांमध्ये माजी आमदार माधवराव जवळगावकर, खा. नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी संचालक विजयसिंह देशमुख (देगलूर) व राजेंद्र केशवे (माहूर), नांदेड विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या संगीता पाटील डक यांचा समावेश होता.

Nanded News
Nanded Political News : भाजपा प्रवेश बारगळल्यावर बेटमोगरेकरांच्या सेना प्रवेशाची चर्चा !

प्रचाराच्या दहा दिवसांच्या कालावधीत खा. चव्हाण यांनी वेगवेगळ्या बैठका-सभांना उपस्थिती लावली; पण उमेदवार निश्चित करताना प्रस्थापित गटाने 'अ' मतदारसंघात नांदेड आणि देगलूर या दोन तालुक्यांत दिलेल्या उमेदवारांकडे मतदारांचे पुरेसे समर्थन नव्हते. सबंध निवडणूक प्रक्रियेत लिंगायत आणि आर्यवैश्य समाजाचा एकही उमेदवार वरील गटाने दिला नाही. जे होते त्यांना समजावून किंवा दडपण आणून बाजूला बसविण्यात आले. त्याचा राग वरील दोन तालुक्यांत दिसून आला. खा. चव्हाण यांच्या काही समर्थकांनीच देगलूरमध्ये श्वेता बसवराज पाटील या विरोधी उमेदवारास उघडपणे पाठींबा दिला.

नांदेड तालुक्यात माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी रेटून धरलेले अतुल माधव वाघ यांना खा. चव्हाण यांनी उमेदवारी दिल्यामुळे आ. राजूरकर समर्थक असलेल्या विठ्ठल पाटील डक यांनी आपली सहचारिणी संगीता पाटील यांचा अर्ज कायम ठेवला. बहुसंख्य मतदार डक दाम्पत्यासोबत असल्याचे प्रचार काळामध्येच दिसून आले. तसेच हे मतदार शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहिल्यामुळे नांदेड तालुक्यात प्रस्थापितांच्या दृष्टीने अनपेक्षित निकाल येईल, असे सांगितले जात आहे. देगलूरमध्येही तशीच हवा असल्याची माहिती या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी दिली.

मतमोजणीची तयारी पूर्ण

जिल्हा बँक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या यंत्रणेने मंगळवारच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी केली आहे. ही मतमोजणी लेबर कॉलनी परिसरातील ललित कला भवनाच्या सभागृहामध्ये होणार आहे. दुपारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर १५ दिवसांच्या आत म्हणजेच स्वातंत्र्यदिनापूर्वी बँकेच्या नव्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्याचवेळी मागील तीन-चार महिन्यांपासूनची प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news