Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपींच्या पथकाचा छापा

नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तिच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
Illegal Sand Transport
Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपींच्या पथकाचा छापाfile photo
Published on
Updated on

DySP's squad raids illegal sand transport

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तिच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २७ जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुशील जुमडे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. कंधार आणि उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या धडक कारवायांमध्ये ४८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Illegal Sand Transport
Social Welfare Hostel Nanded : वेळ बदलला; व्यवस्था नाही! समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर जेवणच नाही

पहिली कारवाई कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुमडे यांच्या विशेष पथकाला कंधार-लोहा रस्त्यावरून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने राजयोग हॉटेलजवळ नाकाबंदी करून हायवा ट्रक (MH-26-CV-3762) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांना गुंगारा देत गाडी गोलेगाव आणि मुखेड रोडच्या दिशेने पळवली.

पोलीस पथकाने तात्काळ पाठलाग सुरू केला असता, चालकाने रस्त्यावरच ट्रॉली उचलून वाळू ओतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर गोळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी हायवा रोखला; मात्र अंधाराचा फायदा घेऊन चालक पसार झाला.

Illegal Sand Transport
Nanded Theft | कुंटूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; २.६३ लाखांचा ऐवज लंपास

या वाहनाची चौकशी केली असता हायवाचा मालक कैलास उद्धव रेनके आणि रमेश दिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक जप्त केला असून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्माननगर हद्दीतही कारवाई - दुसऱ्या एका कारवाईत उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पथकाने झेप घेत कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news