अंडरब्रिजच्या दुरुस्तीला सुरुवात; वाहतूक वळवली

नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या पाठपुराव्याला यश
nanded news
अंडरब्रिजच्या दुरुस्तीला सुरुवात; वाहतूक वळवलीfile photo
Published on
Updated on

Underbridge Repairs Begin; Traffic Diverted

किनवट, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिजच्या निकृष्ट कामाबाबत नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रेल्वे प्रशासनाने अंडरब्रिजच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी संबंधित मार्ग तात्पुरता बंद करून वाहतूक वळविण्यात आली आहे.

nanded news
Raksha Khadse : शहराचा सिटी इकॉनॉमिक रिजनमध्ये समावेश

शिवाजीनगर येथील रेल्वे अंडरब्रिज अत्यंत निकृष्ट दर्जाने बांधण्यात आल्यामुळे रस्त्याच्या सिमेंट पृष्ठभागावरून वाहनांची ये-जा होताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. यामुळे नागरिक, विद्यार्थी, पादचारी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. धुळीमुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास यांसारख्या आरोग्य समस्या वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुजाता येंडूलवार यांनी दक्षिण मध्य रेल्-वेच्या महाव्यवस्थापक तसेच नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून अंडरब्रिजची तत्काळ तांत्रिक तपासणी, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना, निकृष्ट कामाची चौकशी आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

nanded news
Poor quality construction : 11 कोटींच्या कामाचे सिमेंट काँक्रीट उखडले

या निवेदनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता (कामे), आदिलाबाद यांच्या कार्यालयाकडून जारी आदेशानुसार १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत लेव्हल क्रॉसिंग क्र. १२ (किनवट शहर ते नागझरी मार्ग) येथील अंडरब्रिजच्या रस्त्याच्या पृष्ठभागाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व वळवटा दर्शक फलक लावण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काम सुरू असताना संबंधित अंडरब्रिज मार्ग बंद ठेवला असून, वाहतूक कि.मी. ११६/६-७ येथील आरयूबी क्र. १४०ए (सुभाषनगर अंडरब्रिज) मार्गे वळविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news