

उमरखेड : शहरातील दोन गटात समोरासमोर झालेल्या हाणामारीत एका २३ वर्षीय युवकाची चाकू, तलवार आणि रॉड ने मारून निर्घुण हत्या करण्यात आली. ही आठवडी बाजार परिसरात काल रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या हाणामारीत आनखीन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत .
अजहर शेख अकबर (२३ ) असे मयत युवकाचे नाव आहे. तर, शेख मुदशीर शेख जमीर ( २७ ) शेख आरिफ शेख निसार (२२ ) असे दोन गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मयत युवकाचा मोठा भाऊ शेख खालीद शेख अकबर याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, काल संध्याकाळी ताजपुरा वार्डात दोन गटामध्ये भांडण झाले होते. दोन्ही गट परत रात्री 12:00 ते 12:30 वाजता दरम्यान आठवडी बाजार येथे समोरासमोर येऊन एकमेकांना भिडले.
त्या भांडणामध्ये शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील रा. ताजपुरा वार्ड उमरखेड, शेख उबेद निसार रा. ताजपुरा वार्ड उमरखेड, शेख आरीश शेख खतीब रा. हुतात्मा चौक व इतर सोबतच्या तीन ते चार लोकांनी मिळून शेख अजहर शेख अकबर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. चाकू, तलवार, रॉड ने त्याच्या मानेवर , पाठीवर व पोटावर अनेक वार करून त्याला गंभीर जखमी केले व पळून गेले. हि घटना मात्र नेमक्या कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप कळले नाही. ' गॅगवार ' मधुन ही घटना घडली असेल तर उमरखेड शहरात गँगवार ने डोके वर काढल्याची चर्चा आज दिवसभर शहरात होती कारण किमान दहा - दहा युवक या हाणामारीत समोरासमोर भिडले होते अशी माहिती घटना घडल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन, आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे.