Nanded Crime News : पिस्टल, काडतूससह दोघांना अटक

३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded News
Nanded News : पिस्टल, काडतूससह दोघांना अटकfile photo
Published on: 
Updated on: 

Two arrested with a pistol and a cartridge

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : अवैध पिस्टल बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. माळटेकडी उड्डाणपुलाखाली बुधवारी (ता. २५) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded News
Nanded trap against fake doctor|बंगाली बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार, माहिती कळताच आरोग्य विभागाने रचला सापळा

सर्वेश सतीश मुदीराज (वय २४, रा. सुंदरनगर) व प्रितम ऊर्फ बबलू लाला आनंद लोखंडे (वय २२, रा. संघसेन नगर, मच्छीमार्केट, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सपोनि रवी वाहुळे व त्यांचे पथक मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. महाराणा प्रताप चौक परिसरात गस्त घालत असताना, दोघे तरुण पिस्टल व काडतूस विक्रीसाठी माळटेकडी उड्डाणपुलाखाली थांबल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान सर्वेश मुदीराज याच्या कमरेला पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. परवान्याविना शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३५ हजार रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे काडतूस, असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nanded News
Nanded News : प्रारूप मतदार यादीसाठी उद्यापासून सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबीर

प्राथमिक चौकशीत हे शस्त्र अजय ताटे (रा. संघसेन नगर) याच्याकडून खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले. या तिघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ व ७/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व पोनि अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.