Nanded Three caught stealing motor pump cables|मोटरपंपाचे केबल वायर चोरणारे तिघे रंगेहात पकडले

नागरिकांच्या सतर्कतेमुळे कारवाई; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

उमरखेड : तालुक्यातील पोफाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या वेणी धरण परिसरातील शेतांमधून मोटरपंपाचे केबल वायर चोरणाऱ्या तिघांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये एक प्रौढ आरोपी असून दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २४ हजार रुपये किमतीचे तांबे व इतर केबल वायर तसेच चोरीसाठी वापरलेली स्कुटी जप्त केली आहे.

Crime News
Nanded DCC Bank Recruitment : नांदेड बँक नोकरभरतीवरअद्यापही स्थगिती कायम!

पोफाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात ही घटना ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. डोंगरगाव येथील श्रीनिवास बाबाराव देशमुख यांना वैभव बाळासाहेब देशमुख यांनी गावातील सचिन दत्तराव नेमाडे, युवराज बापुराव पोटे व पुंजीजी लक्ष्मण नेमाडे हे शेतातील मोटरपंपाचे केबल वायर हिरो डेस्टीनी स्कुटी (क्र. एमएच ३१ एफव्ही ९६१५) वरील नायलॉनच्या पोत्यात भरून नेत असल्याची माहिती दिली.

यानंतर फिर्यादी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुर्गेश राम भंडारी (वय २१, रा. तुकाराम बापू वॉर्ड, पुसद) याच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना स्कुटी व केबलच्या पोत्यासह पकडण्यात आले. पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये कापलेले मोटरपंपाचे केबल वायर आढळून आले.

Crime News
Sachkhand Express delay today: नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस आज आठ तास उशिरा धावणार

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये फिर्यादीच्या वेणी धरणातील मोटरपंपाचे सुमारे ६५ फूट वायर (किंमत ३ हजार २५० रुपये) तसेच संभाराव रामराव देशमुख, अवधूत ग्यानबाराव हातमोडे, अनिल विठ्ठलराव देशमुख, सुदर्शन पांडुरंग देशमुख, शेख नजीर, शेख चाँद, दीपक पंडीराव देशमुख व नरसिंगराव भीमराव देशमुख यांच्या शेतातील केबल वायरचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २४ हजार रुपये आहे.

या प्रकरणी श्रीनिवास देशमुख यांच्या फिर्यादीवरून पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दुर्गेश भंडारी याला अटक करण्यात आली असून, दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोफाळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चिल्लोळकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.