Nanded News : 'त्या' स्फोटांचे गूढ वाढले; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

नांदेडमधील जळीत कांड : यंत्रणांचा कसून तपास
Fire News
Fire News file photo
Published on
Updated on

The Mystery Surrounding 'Those' Explosions Deepens; Police Uncover Important Clues

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

नांदेडमध्ये रमजान ईदच्या दिवशी घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण नांदेड हादरले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा केवळ अपघात नसून, त्यामागे काही गंभीर कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, तपासाचा पुढचा टप्पा कसा असेल याकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. ? दुचाकी स्फोट प्रकरणात झालेल्या मत्याफसहा स्फोटांचे गूढ वाढले असून, घातपाताच्या संशयावरून सर्व प्रशासकीय यंत्रणा याचा कसून तपास करीत आहे.

Fire News
Beed suspicious death : बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

खुदबेनगर ते वाजेगावदरम्यान पुलावर दुचाकीस्वाराचा जळून मृत्यू झाल्याच्या घटनेला आता २४ तास उलटले असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडातून झालेला अपघात आहे की नियोजित घातपात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्याच्या विविध तपास यंत्रणांनी नांदेडमध्ये तळ ठोकला आहे.

स्फोटांचे स्वरूप, प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आणि व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकू येणारे ६ ते ७ स्फोट हे केवळ पेट्रोल टाकीचे नसून, एखाद्या स्फोटक सदृश वस्तूचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की आजूबाजूचा परिसर हादरून गेला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) समांतर तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून जळालेल्या दुचाकीचे अवशेष, माती आणि रसायनांचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतरच मकेमिकलफ किंवा मएक्सप्लोझिव्हफ्चा वापर झाला होता का, हे स्पष्ट होईल.

Fire News
Crime News : खासगी रुग्णालयात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह

पोलिसांकडून कसून तपास सीसीटीव्ही आणि सायबर सेलची मदत घेऊन मृत व्यक्ती नेमकी कुठून आली होती? त्याने वाटेत कुणाची भेट घेतली होती का? हे शोधण्यासाठी पोलिसांनी ईदगाह मैदान आणि वाजेगाव परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सायबर टीम मृत व्यक्तीच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ? मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

दुचाकीचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबरवरून मालकाचा शोध घेण्याचे काम आरटीओ च्या मदतीने सुरू आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची देखील पोलीस पडताळणी करत आहेत. यामध्ये पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागले आहेत. मात्र, त्याची गोपनीयता पाळली जात आहे. सध्या पोलिस ममिसिंग पर्सन्सफच्या डेटाशी या घटनेचा संबंध जोडत आहेत. शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीच्या शरीरात काही संशयास्पद वस्तू आढळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. फॉरेन्सिक अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचू. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सुरज गुरव,
अपर पोलिस अधीक्षक, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news