Nanded Rain News : बारूळ येथील मानार धरणावर पाऊस रुसला

कंधार : ऑगस्ट महिन्यात धरणात केवळ ५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध
Nanded News
Nanded News : बारूळ येथील मानार धरणावर पाऊस रुसलाfile photo
Published on
Updated on

The Lower Manar Project is the largest project in Nanded district

संघपाल वाघमारे

कंधारः निम्न मानार प्रकल्प नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, या तीन तालुक्याची तहान भागवणारा प्रकल्प आहे. सर्वप्रथम जून महिन्यांपासून कंधार तालुक्यामध्ये रिमझिम पावसाने न सुरुवात केली. त्यामुळे धरणामध्ये पाहिजे तेवढा येण्यास सुरुवात झाली नाही. ऑगस्ट महिन्यात धरण भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. मात्र आज घडीला धरणामध्ये ५७टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने धरणावर पाऊस रुसला की काय अशी म्हणायची वेळ आली आहे.

Nanded News
Tiranga Bike Rally : महापालिकेच्या 'तिरंगा बाईक रॅलीला' अभूतपूर्व प्रतिसाद

दरम्यान, यावर्षी सरासरच्या तुलनेत कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने बारूळ येथील मानार प्रकल्प आज घड़ीला ५७ टक्के भरले आहे. या वर्षी धरण १०० टक्के भरले तर, कंधार, नायगाव, बिलोली या तालुक्यातील नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. आणि २४ हजार हेक्टर वरील शेतीचा सिंचनाचा प्रश्न तसेच भोई समाजाच्या शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ही मिटतो.

कंधार, नायगाव, बिलोली, या तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यासाठी तसेच भोई समाजासाठी हा प्रकल्प कामधेनू असून या प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. मागील चार वर्षी पासून हा प्रकल्प १०० टक्के भरत आला आहे.

Nanded News
Nanded News : एसटी महामंडळाच्या बसेस शहरातून सुसाट !

यंदा मात्र रिमझिम पावसामुळे प्रकल्पात सध्या ५७ टक्के पाणी साठा आहे. तर मागील वर्षी हा प्रकल्प या महिन्यात १०० टक्के भरलेला होता. त्यामुळे पुढील दीड महिने पावसाळा शिल्लक आहे. परंतु पाण्याच्या पातळीत वाढ होते की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news