Nanded News : सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SS

लोकपारंपरिक कलावंतांच्या भजन आंदोलनाने जिल्हा कचेरी दणाणली !
Nanded News : सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SS
Nanded News : सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SSfile photo
Published on
Updated on

The district office reverberated with the *bhajan* protest by traditional folk artists

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर डॉ. वामनदादा कर्डक यांच्या शब्दांतून सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SS असे गीत गायनातून आर्जव करुन आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि.२५ ऑगस्ट रोजी बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाच्या वतिने भव्य भजन आंदोलनाने नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.

Nanded News : सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SS
Nanded News : वाजपेयींच्या पुतळ्यासाठी अशोक चव्हाणांचा पुढाकार !

आपल्या न्याय व हक्कासाठी साहित्यिक व लोकपारंपरिक कलावंतांनी बहुजन टायगर युवा फोर्स आणि पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांच्या नेतृत्वात या भजन आंदोलनात सहभागी लोकपारंपरिक कलावंतानी जिल्हाधिकारी तथा, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेंतर्गत मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष यांना निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सामाजिक कार्यकर्ते कैलास माने पोटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध जनहिताच्या मागण्या निवेदनातून करण्यात आली. या भजन आंदोलनाला पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके आणि विविध सामाजिक संघटनांनी भेटून पाठिंबा दिला.

Nanded News : सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो SS
Nanded News : कंधार न्यायालयाच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार !

या भजन आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा. भवरे, शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर बापुराव जमधाडे, भीमशाहीर माधव वाढवे, शंकर गायकवाड, ह.भ.प. बालाजी पांचाळ, अंकुश चित्ते, विकासराजा गायकवाड, शिवाजी डोखळे, अविनाश कदम, किशन ठमके, जळबा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, आनंदा जळपते, सागर शिरमोड ज्योतीताई बेदरकर, सुभाष गुंडेकर, रामजी कदम, तेजाब पाईकराव, केशव माने, वाघमारे बापू, विलास ढवळे,

देवकाबाई मुलगीर, ज्योतीताई इंगोले, बबीता आठवले, भुजंग लोणे, शाहीर रामराव वानखेडे, शाहीर यमदलवा आदेगावकर, ज्ञानोबा बाबर, नामदेव जाधव मुगावकर, मीराताई जाधव, अरुणाताई सावते, नागनाथ वच्छेवाड, सुरेखा डोखळे, साहित्यिक महेश अण्णा पुरे, जयशीला जाधव, मथुराबाई माने, सुगंधा घोडके, सुशिला वालेगांवकर, अनिता जाधव, मुक्ता कदम, वनिता लोखंडे, कौशल्या नरवाडे, कांता आढाव, छाया कदम, स्वाती सोळंके, वच्छला शिरसुफळे आदींसह जिल्हाभरातील शेकडो लोकपारंपरिक कलावंतांनी पारंपरिक वेशभूषा व वाद्यांसह हजेरी लावून भजनातून प्रशासनाचे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news