महापौरपदाचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीतच !

बावनकुळेंच्या गुगलीने स्थानिक भाजपा नेते 'क्लीन बोल्ड'
nanded news
महापौरपदाचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीतच !file photo
Published on
Updated on

The decision regarding the mayoral post will be made in the core committee meeting

रमेश पांडे

नांदेड : येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्य उमेदवारांच्या निवडीचा निर्णय स्थानिक पातळीवर नव्हे, तर राज्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मेतला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे वार्ताहर बैठकीत दिली.

nanded news
Nanded Crime | नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी, मोटार पंप चोरणाऱ्या टोळीला अटक : ५ जण गजाआड; ५.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यांच्या या विधानामुळे भाजपाचे उपस्थित स्थानिक पदाधिकारी अक्षरशः बुचकळ्यात पडले. मनपा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशाचे शिल्पकार खा. अशोक चव्हाण यांना महापौरपदाच्या निवडीपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

परभणी जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महसूलमंत्री बावनकुळे रविवारी परभणी जिल्ह्यात आले होते. त्यांचे रात्री नदिडमध्ये आगमन झाले. सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात आयोजित वार्ताहर बैठकीत बारनकुळे यांना नांदेडचा महापौर कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महापौरपदाच्या उमेदवाराची निवड स्थानिक पातळीवर होणार नाही, तर राज्याची कोअर कमिटीच उमेदवार ठरविणार आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा प्रश्नही येत्या काही दिवसांत निकाली काढला जाईल. लातूर की नदिड, याचा फैसला होणार असल्याचेही ते म्हणाले.

nanded news
Nanded News : पंजाबातील महिला सरपंचांना येरगीतील स्थापत्य कलेचे कौतुक

दरम्यान नदिहच्या महापौरपदाची येत्या १० फेब्रुवारी रोजी निवड होणार असल्याने याबाबतचे सर्वाधिकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच घेतील, अशी चर्चा सुरू होती, परंतु बावनकुळे यांच्या गुगलीमुळे उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या, २०१७ च्या मनपा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला ८१ पैकी ७३ जागा मिळवून दिल्या. श्यावेळी भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत जिल्ह्यातील जातीय व राजकीय समीकरण बदलले असतानाही खा. अशोक चव्हाण यांनी मनपा निवडणुकीत भाजपच्या ८१ पैकी ४५ जागा निवडून आणल्या. अत्यंत कठीण परिस्थितीत मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय खा. अशोक चव्हाण यांनाच जाते. शिवसेनेलाही सोबत घेऊन सदस्य संख्या ५० रुया उंबरठ्यावर आणली, तरीही महापौरपदाच्या निवडीचा चेंडू प्रदेश कोअर कमिटीच्या तंबूत कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे.

यावेळी आ. राजेश पवार, संघटनमंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष अमरतात राजूरकर, किशोर देशमुख, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, महेश खोमणे, मिलिंद देशमुख, निलेश पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाकडे आठ नावांचा प्रस्ताव । महापौर पदासाठीच्या उमेदवाराचा निर्णय

प्रदेश कोअर कमिटी घेणार असल्याने नांदेडमधून आठ नावाचा प्रस्ताव आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बचेत दिल्याचे समजले. यात सुदर्शना महेश खोमणे, शांभवी प्रवीण साले, कविता संतोष मुळे, वैशाली मिलिंद देशमुख, ज्योती किशन कल्याणकर, शैलजा किशोर स्वामी, जयश्री निलेश पावडे आणि अनुराधा राजू काळे ही आठ नावे या प्रस्तावात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या महापौरपदचा उमेदवार प्रथमच मुंबईत ठराविला जाणार आहे.

महापौर निवडीच्या पाश्र्वभूमीवर प्रवीण साले, महेश खोमणे, मिलिंद देशमुख, नीलेश पावडे आदी महिला नगरसेविकांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांची भेट घेतली. यापैकी काहींनी बावनकुळे यांच्याशी स्वतंत्र चर्चाही केल्याची माहिती आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत महापौर ठरवणार असल्याने यापैकी काहींनी मुंबईत भेटण्याची वेळही मागितल्याचे समजले.

वार्ताहर बैठकीत बावनकुळे यांच्या शेजारी आ. राजेश पवार आसनस्थ झाले. त्यामुळे या खुचर्चीवर बसण्यासाठी आलेले संघटनमंत्री संजय कौडगे यांना अखेर कक्षाबाहेर जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news