किनवटच्या जंगलातील सागवानाचा देखणा कोरीव शिल्पसाज

माळेगाव यात्रा; वन प्रकल्प विभागाच्या वतीने पहिल्यांदाच प्रदर्शन
 teak wood carved sculptural decorations
किनवटच्या जंगलातील सागवानाचा देखणा कोरीव शिल्पसाजFile Photo
Published on
Updated on

The beautiful carved sculptural decorations made from teak wood in the Kinwat forest.

माळाकोळी, पुढारी वृत्तसेवाः माळेगाव यात्रेत यंदा वन प्रकल्प विभागाच्या वतीने पहिल्यांदाच अस्सल गावरान सागवान लाकडापासून तयार केलेल्या कोरीव शिल्प व विविध उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून हे प्रदर्शन भाविक व नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

 teak wood carved sculptural decorations
Hadgaon municipal council election result 2025 | हदगाव नगरपालिकेत 'मशाल' पेटली! रोहिणी वानखेडे नगराध्यक्षपदी; काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

किनवट येथील वन प्रकल्प विभागांतर्गत अल्लापल्ली येथील ओरिजनल सागवान लाकडापासून बनवलेल्या या कोरीव मूर्ती व वस्तू विक्रीसाठी माळेगाव यात्रेत दाखल झाल्या आहेत. अल्लापल्ली येथील सागवान हे शुद्ध, अस्सल व शासकीय दराने उपलब्ध असून या सागवानाचा वापर अयोध्या येथील श्री राम मंदिर, संसद भवन, सप्तशृंगी माता मंदिर, मुंबई येथील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी करण्यात आला आहे.

या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश रोजगारनिर्मिती करणे, सागवानाच्या शासकीय विक्रीबाबत जनजागृती करणे व वन प्रकल्प विभागाच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे असल्याचे विभागीय व्यवस्थापक उज्वला बांगर, सहायक व्यवस्थापक जे.डी. पहाड, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. बी. संदुपटलवा, वनपाल एस. डी. मुंडे, वनरक्षक ए. जी. डावखरे व एस. एम. सोमासे यांनी सांगितले आहे.

 teak wood carved sculptural decorations
Leopard Sighting | रानसुगाव-निळेगव्हाण शिवारात बिबट्याचा मुक्काम वाढला; अंगावर शहारे आणणारे थरारक प्रसंग, वनखात्याची तारांबळ

कोरीव मूर्तीत कुठेही जोड नाही

या प्रदर्शनात भगवान गौतम बुद्ध, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, गणपती, महादेव आदींच्या आकर्षक कोरीव मूर्तीसह मोबाईल स्टॅण्ड, सजावटीच्या व शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती एकाच सागवान लाकडातून कोरलेल्या असून कुठेही जोड वापरण्यात आलेला नाही.

चंद्रपुरात तयार केल्या जातात मूर्ती

नागरिकांना घर, फार्महाऊस, कार्यालय, हॉटेल तसेच घरातील फर्निचर सागवान लाकडापासून तयार करता येऊ शकते. हे सागवान सहा ते साडेसहा हजार घनफूट या प्रमाणात शासकीय दराने वन विभागामार्फत विक्रीस उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथील शासकीय आरा मशीनमध्ये या कोरीव मूर्ती तयार केल्या जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news