

Tears in the eyes of teachers and students of Kolambi Zip School
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : दत्त संस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या कोलंबी या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक राजेश्वर डोमशेर यांनी गेल्या आठ वर्षांच्या अखंड सेवेनंतर कोलंबीतील शैक्षणिक कुटुंबाचा निरोप घेतला.
सन २०१८ पासून या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले आणि मागील दोन वर्षांपासून प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डोमशेर यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोलंबी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा व खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी उल्-लेखनीय कामगिरी केली. शैक्षणिक गुण वत्ता, प्रशासकीय दुवा, विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि सांस्कृतिक जागृती या सर्वच क्षेत्रांत त्यांनी कोलंबी केंद्राचे नाव नेहमी प्रथम क्रमांकावर ठेवले. दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन, ऑनलाईन उपक्रम, लेझीम पथक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण केली.
त्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक व शाळेतील सहकाऱ्यांनी कोलंबी शाळेला एक आदर्श स्वरूप प्राप्त करून दिले. या काळात सहकारी शिक्षक अनुपमा बन, दिलीप कुलकर्णी, संजय खंडागळे, गोविंद कोम्पलवाड, केरबा सोनमनकर, मनीषा माळवतकर, सुनिता नरवाडे, सुधाकर ताटे तसेच पोषण आहार विभागातील बेबीताई बैस, सुरेखा मावशी आणि बना मावशी यांनी सरांना नेहमीच मोलाचे सहकार्य दिले.
यावेळी गावातील नागरिक, शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक बांधवांच्या डोळ्यातून अश्रू बाहत होते. "सर, तुम्ही जाऊ नका आम्हाला करमत नाही, तुमची खूप आठवण येईल," अशी भावनिक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
या निरोप प्रसंगी गोदामगावचे मुख्याध्यापक शहाजी सुनपे, माधव मोरे पाटील, दत्ता पाटील, मिलिंद दरबारे, माधवराव वटपलवाड, रमेश तर्फेवाड, राम झुडपे, उत्तमराव गायकवाड, धम्मदीप गायकवाड, साहेबराव मोरे, इंग्रजी माध्यम शाळा मांजरमचे बालाज- ीराव शिंदे पाटील, कदम तसेच कोलंबी मर केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
नायगाव तालुक्यातील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी देखील शैक्षणिक कार्यात सहकार्य दिल्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनीही त्यांच्या सेवेला सलाम केला. श्री डोमशेर यांचा शिस्तप्रिय व सेवाभावी दृष्टिकोन सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या जाण्याने शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मनात एकच भावना होती. 'सर, तुमची उणीव आम्हाला दररोज जाणवेल.'