

Tapovan, High Court Express and other trains will run late
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विविध मार्गावर टी-२८ मशिनद्वारे देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यात खोल स्क्रिनिंग व महत्त्वाच्या क्रॉसओव्हर कनेक्शनच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी तीन तासांचे ट्रॅफिक ब्लॉक्स घेण्यात येणार असून महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मंगळवारी (दि. ९० हे काम हाती घेण्यात आले असून ते महिनाभर दि. १० ऑक्टोबर पर्यंत चालेल. यामुळे मनमाड-धर्माबाद मराठवाडा अर्थात हायकोर्ट एक्स्प्रेस (गाडी क्र. १७६८७) दि. ११ रोजी दौलताबाद स्थानकावर ६० मिनिटे थांबेल, असे कळविण्यात आले आहे. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (क्र.१७६१७) दि. १३ सप्टेंबर रोजी रंजनी स्थानकावर एक तास ५० मिनिटे थांबेल तर नगरसोल-नरसापूर (१२७८८) कोडी स्थानकावर ६० मिनिटे थांबेल.
काचीगुडा-नगरसोल (क्र. १७६६१) ही गाडी दि. १५ सप्टेंबर रोजी मालटेकडी स्थानकावर ४० मिनिटे, लिंबगाव स्थानकावर १७ व १८ रोजी ८० मिनिटे, दि. २० रोजी याच स्थानकावर ३० मिनिटे, दि. १५ रोजी मालटेकडी स्थानकावर ८० मिनिटे थांबणार आहे. आदिलाबाद-हुजूर साहिब नांदेड (क्र. १७४०९) दि. १५ रोजी मालटेकडी स्थानकावर ८० मिनिटे थांबेल. काचीगुडा-नरखेड (१७६४१) ही गाडी दि. १७ व १८ रोजी लिंबगाव स्थानकावर ४० मिनिटे थांबणार ।हे. दि. २४, २५ व २६ रोजी बोल्डा स्थानकावर ३० मिनिटे तर दि. २८ व ३० सप्टेंबर व दि. १, ३, ५, ७, ८ आणि १० ऑक्टोबर रोजी मर्मुल स्थानकावर १५ मिनिटे थांबेल, असे द.म.रे.ने कळविले आहे.
काचीगुडा-मनमाड (क्र. १७०६४) आणि मनमाड-काचीगुडा (क्र. १७०६३) या अजंठा एक्स्प्रेसच्या कोच संरचनेत डिसेंबरपासून बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार ३ डिसेंबरपासून या गाडीला प्रथम श्रेणी वातानुकूलित एक, द्वितीय श्रेणी २, तृतीय श्रेणी वातानुकूलित ६ डबे तर द्वितीय श्रेणी स्लीपर ७, जनरल ४ व एस. एल. आर. २ डबे असे एकूण २२ डबे असतील.
नांदेड विभागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेसला दि. १४ सप्टेंबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आल होता. त्याला आता अनिश्चित काळासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते हिंगोली (क्र. १२०७१) व हिंगोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (क्र.१२०७२) या मार्गावर धावते.