Farmer Death | मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी संघर्ष: हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले

Nanded News | अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान
Himayatnagar farmer Death
लक्ष्मण पालजवाडPudhari
Published on
Updated on

Himayatnagar farmer Death

हिमायतनगर : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीसोबतच वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या आर्थिक संकटाला कंटाळून आदेगाव (ता. हिमायतनगर) येथील लक्ष्मण पोतंन्ना पालजवाड (वय ४५) या शेतकऱ्याने मंगळवारी (दि.९) गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत पालजवाड यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते झगडत होते. मात्र, सलग अतिवृष्टीमुळे नाल्यालगत असलेली त्यांची शेती वाहून गेली. वाढत्या आर्थिक ताणाला कंटाळून त्यांनी शेतातील गट क्रमांक २४१ मधील पळसाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

Himayatnagar farmer Death
रेल्वे : नांदेड विभागात ७३ हजार फुकट्यांवर कारवाई

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी व गावकरी घटनास्थळी धावून आले. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे हलविण्यात आले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांच्या मते, अलीकडच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नव्हती. उलट बँकांकडून कर्जफेडीसाठी सतत नोटिसा येत होत्या. त्यातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या फीचा प्रश्न, इतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरगाडा चालविण्याची जबाबदारी यामुळे पालजवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news