

जोStormy weather Naigaon
नायगाव : नायगाव तालुक्यात २५ व २६ एप्रिल रोजी सायंकाळी, रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने फळ बागा,हळद,उन्हाळी ज्वारी , भुईमुग शेंग आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह बंद पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खैरगाव येथील डॉ. शिपाळे यांच्या शेतातील आंब्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नायगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून दुपारी उन्हाचा तडाका, तर सायंकाळी ,पहाटे,वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक गावात विजेच्या तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला तर उद्योग,व्यवसाय याच्यावर या घटनेचा परिणाम झाला आहे. खैरगाव येथे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेती हा व्यवसाय सांभाळणारे डॉ. शिंपाळ यांची फळबाग शेती आहे.
वादळी वाऱ्याने आंबा झाडाखाली सडा पडावा तसा आंब्याचा सडा पडला आहे . प्रचंड नुकसान झाले आहे. तळ हाताच्या फोडा प्रमाणे जोपासलेली सर्व फळे जमिनीवर पडून प्रचंड नुकसान झाले आहे. ही अवस्था तालुक्यात बहुतांश गावात आहे.