

Natinoal Highway Accident
हिमायतनगर प्रतिनिधी : चंद्रपूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असली तरी अनेक ठिकाणच्या फाट्यावर संबंधित विभागाने स्पीडब्रेकर आणि डिव्हायडर बनविले नसल्याने दिवसगणीक अनेक अपघात होत आहेत. आत्तापर्यंत अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. आणखी एक अपघात दिनांक ३१ मे रोजी शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला असून, यात कंटेनर चालक बालंबाल बचावला आहे.
भोकर हिमायतनगर रस्त्यावर रात्री केटीसी कंपनीची सिमेंटची मोठी गाडी AP39-Y0366 ही जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाला साईड देताना नियंत्र सुटून पलटी झाला आहे.
ही घटना दिनांक ३१ में रोजी घडली असून, सदर कंटेनर टेंभी फाट्यापासून जवळपास 100 फूट रोडच्या खाली घासून येत जागेवर पलटी झाला आहे. हा प्रकार हिमायतनगर येथून गावाकडे जात असताना सामाजिक कार्यकर्ते वामन मिराशे यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी पलटी झालेल्या कंटेनरखाली केबिनमधून चालकाला बाहेर काढून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून चालक बालंबाल बचावला आहे.
भोकर हिमायतनगर इस्लापूर या महामार्गावर अतिशय वेगाने मोठ मोठे कंटनेर, वाहतूकीचे ट्रक धावत असुन गावालगत कुठेही गतीरोधक नसल्यामुळे दुचाकी चालकासह लहान वाहनधारकांना जिव मुठीत धरून या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने होत असलेल्या अपघाताची दखल घेऊन या मार्गावर सर्वच फाट्यानजीक स्पीड ब्रेकर लावून प्रत्येक फाटा आणि गावानजीक डिव्हायडर बनवून भविष्यात होणारे अपघात टाळावे अशी मागणी केली आहे.