

माळाकोळी : माळाकोळी ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडीनजीक दुचाकी ने पाठीमागून ट्रकला जोराची धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती आशिकी अहमदपूरहून माळाकोळीकडे मुकुंद बापूराव मुस्तापुरे (वय 23 वर्षे राहणार माळाकोळी) हा तरुण दुचाकी क्रमांक. MH26CB 5907 यावरुन गावाकडे येत होता. पुढे असलेल्या चालत्या ट्रकला ( क्रमांक MH17 BY2741) त्याच्या दुचकीने जोरात धडक दिली. रात्री मोठा पाऊस असल्याने तुरणाला समोरील वाहनाचा अंदाज आला नाही. त्याने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. त्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाच्या पश्चात आई - वडील भाऊ बहीण अशा परिवार आहे.