महापौर-उपमहापौर निवडीसाठी मनपाची आज विशेष सभा !

या सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली असून मनपा प्रशासनाने सभेसाठी आवश्यक ती तयारी केली आहे.
Nanded News
Nanded News : नवीन महापौरांसाठी अधिकृत बंगलाच नाही!File Photo
Published on
Updated on

Special meeting of the Municipal Corporation today for the election of Mayor and Deputy Mayor

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित ८१ नगरसेवकांची विशेष सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली असून मनपा प्रशासनाने सभेसाठी आवश्यक ती तयारी केली आहे.

Nanded News
Nanded News: मांजरमजवळ अपघात, सुसाट बुलेट लोखंडी कठड्याला धडकली; दोन तरूण गंभीर जखमी

तब्बल सव्वातीन वर्षानंतर मनपामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अधिपत्याखाली कारभार सुरू होणार आहे. ८१ नगरसेवकांत भाजपा शिवसेना गटाचे सर्वाधिक ४९ नगरसेवक आहेत. काँग्रेस वंचित आघाडीचे १५ तर एमआयएमचे १४ जण असून 'राष्ट्रवादी'चे ०२ आणि एक अपक्ष नगरसेवक आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी प्रत्येकी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून एकंदर रागरंग पाहता दोन्ही पदांसाठी निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायद्यातील तरतुदीचे तंतोतंत पालन होईल, याची खबरदारी घेतली आहे.

Nanded News
Nanded News : रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा

दोन्ही पदांसाठी मतदान गुप्त पद्धतीने घेतले जावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीनी गेल्या आठवड्यात केली; पण कायद्यात तशी तरतूद नाही. महापौर आणि उपमहापौरांची निवड हात उंचावून (ओपन वोटिंग) केली जावी, अशी तरतूद असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

महापौर-उपमहापौर निवडीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिवसेना गटाच्या नगरसेवकांची अनौपचारिक बैठक सोमवारी सायंकाळी येथे आयोजित करण्यात आली होती.

निवडणुकीचा प्रसंग आलाच तर मतदान कशाप्रकारे करायचे याबद्दल नव्या सदस्यांना काही सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या. मंगळवारच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. ३ मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका मीनल पाटील यांना युतीच्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्या जर बुतीसोबत राहिल्या, तर संख्याबळ ५० होऊ शकते.

महावीर पदासाठी भाजया शिवसेना युतीकडून कला संतोष धुळे, एमआयएमकडून अश्विनी बीगळे तर काँग्रेस वंचित आघाडीतके महजबीन अब्दुल फईम या तीन जणांचे अर्ज दाखल आहेत. उपमहापी पदासाठी युतीनके दीपकसिंह रावत, एमआयषतर्फे अल्कमी समया बल्फाषण सहान अल केसरी तर काँग्रेस वंचित राहुल सोनसळे यांचे अर्ज आहेर सभा सुरू झाल्यानंता १५ मिनिटांच्या अवधीत कोणीही माघातानी नही तर निवडणूक प्रक्रिया सुरू केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news