

Nanded Late Anantrao Rajurkar Nursing College's
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे रुग्णांची सेवा केल्यास मनोभावी ईश्वराचीच सेवा केल्याचे समाधान प्राप्त होते असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या माध्यम शास्त्र संकुलाचे माजी संचालक डॉ. प्रा. राजेंद्र गोणारकर यांनी केले.
लॉरेन्स नाईटिंगेल यांनी काही नियम क्राईम इयर युद्ध दरम्यान जखमी सैनिकांची निस्वार्थ सुश्रुषा केली म्हणून त्यांना लेडी विथ कल्याण. म्हणून संबोधले जाते त्यांची आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक अशीही ओळख आहे.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास यशाच्या शिखरापासून कोणीच रोखू शकत नाही असेही त्यांनी कै. अनंतराव राजूरकर कॉलेज ऑफ नर्सिंग व माऊली नर्सिंग स्कूल यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्ष भाषणात सांगितले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रा. संतोष देवराये संस्थेचे अध्यक्ष मनोज मोरे पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धेश्वर, पाटील शेळके, उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. रवींद्र सोनकांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माऊली नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य भक्ती नरवाडे, अनंतराव राजूरकर कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य वैष्णवी घुगे प्रा. स्वप्निल बुद्धेवाड, प्रा. वैष्णवी केंद्रे, प्रा. सतीश गोविंद पुरे, प्रा. अजय कुमार कांबळे शाहीर गिरीश शेख शफी यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
तत्पूर्वी कार्यक्रमाची दीप प्रज्वलन डॉ. प्रा. राजेद्र गोणारकर, प्रा. संतोष देवराये यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास अश्विनी दाढे किरण कुमार सर्जेराव कांबळे संगीता इंगोले यांचा शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.