भंगार विक्रीतून दक्षिण मध्य रेल्वेने कमावले २३ कोटी

उद्दिष्टपूर्ती : रेल्वे रूळ, पीएससी स्लीपर, प्लॅटफॉर्म ट्रॉलीचा समावेश
nanded news
भंगार विक्रीतून दक्षिण मध्य रेल्वेने कमावले २३ कोटीfile photo
Published on
Updated on

South Central Railway earned 23 crores from scrap metal sale

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये स्क्रॅप विक्रीचा लेख -ाजोखा मांडला असून त्यानुसार २३ कोटी ९ लक्ष रुपयांच्या भंगारची विक्री करण्यात आली. मागील वर्षीपेक्षा ही अधिक आहेच शिवाय १५ कोटीचे देण्यात आलेले उद्दिष्ट सुद्धा पूर्ण करण्यात नांदेड विभागाला यश आले.

nanded news
Sand Smugglers : नांदेडच्या वाळू तस्करांवर कारवाई

भारतीय रेल्वेचा पसारा प्रचंड आहे. मागील दशकामध्ये रेल्वेचा विस्तार प्रचंडप्रमाणात झाला. शिवाय रेल्वे कात टाकते आहे. अत्याधुनिकीकरणावर रेल्वे प्रशासनावर मोठा भर दिला आहे. त्यात दक्षिण मध्य रेल्वे सुद्धा मागे नाही.

या विभागात सर्वत्र रेल्वेस्थानक तसेच रेल्वे पटऱ्यांचे काम सुरु आहे. यामुळे स्वाभाविकच जुने सामान स्क्रॅपमध्ये निघत असून पारदर्शी पद्धतीने त्याची विल्लेवाट लावण्यासाठी रेल्वे विभाग विविध विभागांना उद्दिष्ट आखून देतो. त्यानुसार नांदेड विभागाला १५ कोटी रुपयांचे भंगार २०२५-२६ या आर्थिक वर्षात नष्ट करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

nanded news
Unseasonal Rain Nanded | अवकाळीचा तडाखा ! पैनगंगा अभयारण्य परिसरातील ७५ टक्के पिकांचे मोठे नुकसान

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष २०२५२६ मध्ये स्क्रॅप विक्रीतून २३.०९ कोटी महसूल मिळवत रेल्वे मंडळाने दिलेले १५ कोटींचे उद्दिष्ट लक्षणीयरीत्या ओलांडले आहे. ही कामगिरी रेल्वे मंडळाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५३.९ टक्के अधिक असून, मागील आर्थिक वर्षातील स्क्रैप विक्री महसुलाच्या तुलनेत ५०.२२ टक्के वाढ दर्शवते. यावरून विभागाचा कार्यक्षम मालमत्ता व्यवस्थापन व महसूलवाढीवरील ठाम भर स्पष्टपणे दिसून येतो.

विक्री करण्यात आलेली प्रमुख स्क्रॅप सामग्री

विभागाने मोठ्या प्रमाणावर निकामी व जिर्ण साहित्याची ओळख पटवून त्याची यशस्वी विक्री केली, त्यामध्ये ६७०१.६३ मेट्रिक टन रेल्वे रुळ व फिटिंग्ज, १७,६१७ नग निकामी पीएससी स्लीपर, २ नग अनुपयोगी प्लॅटफॉर्म ट्रॉली, ३०.३८ मेट्रिक टन निकामी बेडशीट, ३८३.७७ मेट्रिक टन इतर फेरस स्क्रॅप आदींचा समावेश आहे. या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे निकामी मालमत्तेची जलद व कार्यक्षम विल्-हेवाट लावण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news