Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून

मयताची पत्नी गंभीर जखमी; पोलिसांनी ५ तासांत ठोकल्या ३ तिघांना बेड्या
Murder Case
Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खूनfile photo
Published on
Updated on

Elderly man brutally murdered in retaliation for the filing of a criminal case

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून एका वृद्ध शेतकऱ्याची चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना मौजे लादगा (ता. मुखेड) शिवारात घडली. बाबू पुंडलिक गायकवाड (वय ६०) असे मृत वृद्धाचे नाव असून, त्यांच्या पत्नीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ५ तासांत चक्रे फिरवून मुख्य आरोपीसह तिघांना जेरबंद केले.

Murder Case
Nanded News : नांदेडमध्ये साखळीचोरीसह जबरी चोरीच्या नऊ गुन्ह्यांचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किशन राजकुमार जोगदंड (रा. दापका राजा) याच्याविरुद्ध ५ ऑगस्ट २०२६ रोजी पीडित महिला रतनबाई यांनी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा राग मनात धरून २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी किशन याने आपल्या इतर दोन साथीदारांसह लादगा शिवारातील शेतात जाऊन रतनबाई यांचे वडील बाबू गायकवाड यांच्या डोक्यात चाकूने गंभीर वार करून त्यांची हत्या केली.

तसेच मध्यस्थी करणाऱ्या रतनबाई यांच्या आईवरही चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मुखेड पोलिसांच्या विविध पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. पोलिसांनी ५ तासांच्या आत १) किशन राजकुमार जोगदंड (वय २२, रा. दापका राजा), २) सोहम सुंदरसिंह बयास उर्फ सोन्या (वय १९, रा. मुखेड) आणि ३) मंगेश निवृत्ती लिंगे (वय ५०, रा. मुखेड) या तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Murder Case
Nanded News : ५० वर्षांच्या मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन

५ तासांत पोलिसांची धडक कारवाई

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार LCB चे पोलीस निरीक्षक अतुल भोसले व मुखेडचे पोलीस निरीक्षक चिंतातूर कामठेवाड यांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या ५ तासांच्या आत तिन्ही आरोपींचे लोकेशन शोधून काढत पोलिसांच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या.

५ ऑगस्टच्या तक्रारीचा सूड

चाकूर (जि. लातूर) पोलीस ठाण्यात पीडित महिला रतनबाई यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी किशन जोगदंड याच्याविरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला होता. पोलीस कारवाईच्या भीतीने आणि याच तक्रारीचा राग मनात धरून आरोपी किशन याने सूडबुद्धीने रतनबाई यांच्या वृद्ध वडिलांचा बळी घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news