शिवसेना ठाकरे गटाचा मुखेडच्या जागेवर दावा; मुंबईमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

शिवसेना ठाकरे गटाचा मुखेडच्या जागेवर दावा; मुंबईमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक
nanded news
शिवसेना ठाकरे गटाचा मुखेडच्या जागेवर दावा; मुंबईमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक File Photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विधानसभेच्या ९ जागांपैकी मुखेडसह ३ जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला असून या जागा लढवण्यासंदर्भात रविवारी मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांत आतापर्यंत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यानंतर ठाकरे गटाने नांदेड जिल्ह्यात नांदेड (उत्तर) यांनी दिली. मतदारसंघासह लोहा कंधार आणि मुखेड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे शिवसेना ठाकरे नेत्यांनी रविवारी गटाच्या पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावले आहे.

पक्षाने लोहा मतदारसंघासाठी एकनाथ पवार यांचे नाव निश्चित केले आहे तर नांदेड उत्तर मतदारसंघाच्य उमेदवारीसाठी पक्षात मोठी चुरस आहे.

ठाकरे गटाने मुखेडच्या जागेवः दावा केला असला, तरी काँग्रेस पक्षही या जागेसाठी आग्रही असून माजी आमदार हणमंतराव बेटमो गरेकर यांच्यासह प्रा. यशपाल भिंगे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलं आहे.

वंचित आघाडीचे दोन उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील काही विधानसभा मतदारसंघातल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे शनिवारी जाहीर केली. त्यांत नांदेड (दक्षिण) मतदारसंघातून फारूक अहमद तर लोहा मतदारसंघातून शिवा नरंगले यांचा समावेश आहे.

nanded news
Maharashtra Political Crisis : शिवसेना पक्ष प्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड बेकायदेशीर : शिंदे गटाचा दावा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news