

उमरी, पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टरखाली सापडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू झाला. ही घटना शेलगाव येथे गुरूवारी (दि.२) सायंकाळी ५. ३० च्या सुमारास घडली. नवनाथ इरबा कुरकुळे (वय ४०, रा. शेलगाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेलगाव येथील नवनाथ रस्त्यालगत असलेल्या शेतात मेंढी चारत होता. यावेळी शेजारच्या शेतात ट्रॅक्टरमध्ये ऊस भरण्याचे काम सुरू होते. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीवरील ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि ब्रेक निकामी झाल्याने नवनाथ याच्या अंगावरून ट्रॉली गेली. ट्रॉलीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात दोन मुले आहेत. याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.