Sharad Ponkshe: 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारकडे का जातो? शरद पोंक्षेंच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; काय म्हणाले?

Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे मंदिरांचा निधी आणि सरकारी नियंत्रण, यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Sharad Ponkshe Controversy
Sharad Ponkshe ControversyPudhari
Published on
Updated on

Sharad Ponkshe Controversy: मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरांतील निधी, सरकारचा हस्तक्षेप आणि धार्मिक संस्थांच्या नियंत्रणावर त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.

शरद पोंक्षे भाषणात म्हणाले की, देशातील अनेक हिंदू मंदिरांमधून मोठ्या प्रमाणावर निधी सरकारी तिजोरीत जमा होतो. “स्वतंत्र भारतात इतकी वर्ष झाली, तरी मंदिरांवरच सरकारचं नियंत्रण का? मशिदी किंवा चर्चवर तस नियंत्रण का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे असंही म्हटलं की, हिंदू समाज सहसा रस्त्यावर उतरून आक्रोश करत नाही, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. “जर समाजाने एकत्र येऊन आवाज उठवला, तर बदल घडू शकतो,” असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे काही जणांनी त्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी त्यावर टीकाही केली.

इतिहास आणि चित्रपटांबाबत बोलताना त्यांनी मुघल काळातील काही गोष्टींवरही प्रश्न उपस्थित केले. काही चित्रपटांमधून इतिहासाचं वेगळं चित्र दाखवलं जातं, असं त्यांनी नमूद केलं. यामुळे त्यांच्या वक्तव्याला आणखी राजकीय रंग मिळाला आहे.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण पोंक्षे यांच्या मताशी सहमत असून धार्मिक संस्थांवरील सरकारी नियंत्रणाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, काहींनी या विधानांना वादग्रस्त आणि भडकाऊ ठरवत टीका केली आहे.

एकंदरीत, मंदिरांच्या निधीचा वापर, सरकारची भूमिका आणि सर्व धर्मांसाठी समान नियम असावेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात या मुद्द्यावर अधिक सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news