

offseason-impact on Sarafa Bazar
नांदेड : सराफा बाजारात मागील दोन ते तीन महिन्यांपासून निर्माण झालेली अनिश्चितता वरचेवर वाढत चालली आहे. नांदेड येथील सराफा व्यावसायावर सुमारे ६० ते ७० टक्के परिणाम झाला आहे. येरवी प्रतिदिन ४० ते ५० कोटी रुपयांची उलाढाल होत असते ती आता १० ते १५ कोटी रुपयांवर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या टेरिफ वॉरमुळे भारताता सर्वाधिक फटका सराफा व्यावसायाला बसला. मागील तीन महिन्यांपासून या व्यवसायात सतत चढउतार सुरू आहेत. मध्यंतरी सोन्याचे दर ६० हजार रुपयांपर्यंत प्रति तोळा उतरणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी रातोरात ९० ते ९५ हजार या दरापर्यंत सोने विकून टाकले. परंतु प्रत्यक्षात मात्र वास्तव उलट दिसून येते.
मागे सराफा व्यवसायात असलेल्या वस्तुस्थितीबाबत वृत्त छापताना पुढारीने सोन्याचे भाव लग्नसराईपर्यंत सव्वालाख रुपये प्रति तोळा इथपर्यंत पोहोचतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या ऑनलाईन पे सिस्टीममुळे कोणत्याही व्यापाऱ्याला दोन नंबरी करण्याचे पर्याय जवळपास संपुष्टात आले आहेत. त्यामुळे कच्चा व्यवहार आणि पक्का व्यवहार यातील फरकसुद्धा नाममात्र झाला आहे. सोन्याच्या बाबतीत या दरात जेमतेम हजार रुपयांचा फरक असल्याचे सांगण्यात येते.
माहितीनुसार व्यक्त केला. त्या दिशेने सोन्याची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. सोमवारी एक लाख ७ हजार रुपयांपेक्षा अधिक दर प्रति तोळा सोन्याचा होता. चांदी सुद्धा त्याचप्रमाणात वाढते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उलथापालथी आणि त्यामुळे देशांतर्गत अनिश्चितता संपुष्टात आली नाही. तर दिवाळीच्या मागेपुढे सोने सव्वाल-ाखाची मर्यादा गाठू शकते, असे अंदाज सध्या व्यक्त होत आहेत.
सोन्याचे वाढत चाललेले भाव आणि ऑफसिझन यामुळे सद्यस्थितीत सराफा बाजारात अगदी किरकोळ उलाढाल सुरू आहे. परिणामी या व्यवसायातील रोजगारांवर सुद्धा विपरीत परिणाम दिसून येतो. मोठ्या व्यापाऱ्यांकडून व्यवहारापुरते सोने घेऊन व्यवसाय चालविणारे छोटे कामगार दुकानदार आणि एकदम मोठ्या गुंतवणुकीच्या पेढ्या वगळता सराफा व्यापारातील मध्यमवर्ग मात्र कमालीचा बेजार असून कर्जाचे हप्ते फेडणेसुद्धा त्यांना कठीण झाल्याचे सांगण्यात येते.