Santosh Bangar Banner : भोकरमध्ये बांगरांच्या ‘भावी मंत्रिपदाचे’ बॅनर्स

खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रात शिंदे गटाच्या आमदाराची पोस्टरबाजी
Santosh Bangar Banner
Santosh Bangar Banner pudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड: माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांचे प्रभावक्षेत्र आणि त्यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या भावी मंत्रिपदाचे बॅनर्स आणि पोस्टरबाजी समोर आली आहे. बारड येथील राष्ट्रीय महामार्गालगत झळकलेल्या दोन डझनहून अधिक पोस्टर्स आणि बॅनरपैकी काहींवर आ. बांगर यांचा उल्लेख थेट ‘भावी मंत्री’ असा करण्यात आल्याने युतीमधील राजकीय कुरघोडी समोर आली आहे.

निवघा (ता. मुदखेड) येथील स्थानिक जत्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी करण्यात आली. त्यामुळे येथील जत्रेला चांगलाच राजकीय रंग प्राप्त झाला. जत्रेनिमित्त येथील काही तरुण कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले.

Santosh Bangar Banner
Beed News : टाकरवनचा सुपुत्र जपानमध्ये करणार आंतरराष्ट्रीय संशोधन!

याच पार्श्वभूमीवर आमदार संतोष बांगर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर रोजी ते जत्रेला भेट देतील, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना होती. त्यानुसार त्यांच्या स्वागतासाठी बारड येथील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने पोस्टर लावण्यात आले. या स्वागतपर पोस्टर्सवर केवळ आगमनाची माहिती न देता काही पोस्टर्सवर ‘भावी मंत्री’ असा उल्लेख केल्याने या पोस्टरबाजीला राजकीय परिमाण प्राप्त झाले.

खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रात हिंगोली जिल्ह्यातील तसेच दुसऱ्या पक्षातील आमदाराच्या भावी मंत्रिपदाची जाहिरात झळकणे, हा स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने चर्चेचा मोठा विषय ठरला आहे.

Santosh Bangar Banner
Beed News : टाकरवनचा सुपुत्र जपानमध्ये करणार आंतरराष्ट्रीय संशोधन!

विशेष म्हणजे, याच जत्रेला भाजपच्या स्थानिक आमदार श्रीजया चव्हाण यांनीही विशेष उपस्थिती लावली होती. परंतु आमदार संतोष बांगर यांच्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात येऊनही ते प्रत्यक्षात जत्रेला उपस्थित राहिले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याची बाब पुढे आली आहे.

जत्रा स्थानिक, पोस्टरबाजी मात्र राजकीय

निवघा येथील जत्रा हा परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असला, तरी यंदा तिच्या निमित्ताने झळकलेल्या राजकीय जाहिरातींनी वेगळेच लक्ष वेधले. एका बाजूला भाजपच्या विद्यमान आमदारांची उपस्थिती, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘भावी मंत्रिपदाची’ घोषणा करणारे बॅनर झळकल्याने भोकर मतदारसंघातील राजकीय पटावर या पोस्टरबाजीची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.