

Sant Sadhu Maharaj Dindi Loha
लोहा: तब्बल तीनशे वर्षाची परंपरा लाभलेलेल्या श्री संत साधू महाराज दिंडी चे लोहा मुक्कामानंतर आज (दि.२०) सकाळी आषाढी एकादशी वारी साठी विठू माउली च्या गजरात पंढरपूर कडे प्रस्थान झाले. यावेळी लोहा शहरात दिंडीचे स्वागत करण्यात आले.
आषाढी एकादशी वारीसाठी विठू माउली च्या गजरात साधू महाराज संस्थान चे आठवे वंशज मठाधिपती एकनाथ महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी पंढरपूर कडे निघाली. यंदा पायी दिंडीचे वेगळेपण म्हणजे वारकरी, भाविक-भक्त, महिला , पुरूष यांच्या नजरेस चांदीचा रथ पालखी व पादुका चटकन लक्ष वेधून घेत होत्या. महिलांच्या डोक्यावर कलश, तुळशी तर वारकरी हाती भगवा पताका, गळ्यात तुळशीची माळा, खंद्यावर विणा, वादकांच्या हाती मृदंग अन् टाळकरी टाळ घेऊन ज्ञानोबा- तुकोबाच्या, विठू नामाच्या रामकृष्ण हरी च्या जयघोषात तल्लीन झाले होते.
यावेळी हभप लक्ष्मीकांत महाराज लोहेकर, किरण सावकार वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक संभाजी चव्हाण, नगरसेवक आप्पाराव पवार, केशवराव पवार, दिनेश तेललवार, तुकाराम सावकार, संजय मक्तेदार, विलास चुडावकर, बाळू चुडावकर, विजयकुमार चन्नावार, गिरीश चन्नावार, बाळू पालीमकर, शंकर शेटे, खंडू पवार, नागेश दमकोडवार, पंकज मोटरवार, व्यंकट जंगले, असंख्य भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पायी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले.