Nanded News
Nanded News : सुरेश सावंत यांना बालवाङ्‌मयासाठी 'साहित्य अकादमी'File Photo

Nanded News : सुरेश सावंत यांना बालवाङ्‌मयासाठी 'साहित्य अकादमी'

साहित्य अकादमीने २३ भारतीय भाषांतील यंदाच्या युवा आणि बालवाड्‌मय पुरस्कारांची घोषणा केली.
Published on

'Sahitya Akademi' to Suresh Sawant for Children's Literature

नांदेड : विशेष प्रतिनिधी

कोलंबसासारखाच मीही वेगळ्या वाटेने जाणार आहे निखळ यशाच्या शिखमावर विराजमान होणार आहे....

Nanded News
E-Kuber System : ई-कुबेर प्रणालीने वाचवले शासनाचे धन !

आभाळमाया या बाल कविता संग्रहातील एका कवितेतून वरील आश्वासक आशावाद जागवणारे नांदेडचे ज्येष्ठ बालसाहित्य लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी आता साहित्य अकादमी पुरस्काराचे शिखर गाठले आहे. त्यांच्या याच संग्रहाला बुधवारी पुरस्कार जाहीर झाला. साहित्य अकादमीने २३ भारतीय भाषांतील यंदाच्या युवा आणि बालवाड्‌मय पुरस्कारांची घोषणा केली.

मराठी भाषा विभागात डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया हा कवितासंग्रहाची निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर सावंत यांच्या नांदेडसह ठिकठिकाणच्या साहित्यिक, प्रकाशक स्नेहीजनांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सुरेश सावंत यांची पुस्तक लेखनाची कारकीर्द अर्थशतकाच्या रण्यावर असताना आभाळमाया हा कवितासंग्रह पुण्याच्या चेतक बुक्सतर्फे २०२३ साली प्रकाशित झाला होता.

Nanded News
Nanded News : किनवट रेल्वे भुयारी पुलाचा प्रश्न पोहोचला राष्ट्रीय स्तरावर

बहुरंगी आणि गुळगुळीत कागदावर छापण्यात आलेला हा कवितासंग्रह लक्षवेधी ठरला होता. उच्च माध्यमिक शाळेच्या स्तरावर अध्यापन आणि नंतरच्या काळात मुख्याध्यापक या नात्याने प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच डॉ. सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, समीक्षा, संशोधन आणि संपादन इत्यादी वाड्‌मय प्रकारात विपुल लेखन केले; पण बालसाहित्य आणि बालशिक्षण तसेच लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे त्यांचे आस्थाविषय राहिले आहेत त्यांची बालसाहित्यातील ३३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार प्रात झाले होते. शिक्षक, मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. प्रौढांसाठी वेगवेगळ्या प्रकारांतील लेखन करतानाच सावंत यांनी बालवाचकांसाठी आपले लेखन सातत्य कायम राखले. दिविव संस्थांच्या बालसाहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार प्रात झाले होते. शिक्षक, मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती. प्रौढांसाठी वेगवेगळ्या प्रकारांतील लेखन करतानाच सावंत यांनी बालवाचकांसाठी आपले लेखन सातत्य कायम राखले. दिविव संस्थांच्या बालसाहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

मराठीतील विख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना गतवर्षी जाहीर झालेला साहित्य अकादमी पुरस्कार अलीकडेथ प्रदान करण्यात आला. त्यानंतर मराठवाडयातील आणखी एका साहित्यिकास बालवाड्मयासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने २०१० पासून वारल्याड्‌मयासाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केले होते. या प्रकारात पुरस्कार प्राप्त करणारे सावंत हे मराठवाड्यातील पहिलेच बालसाहित्यकार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news