Digital Arrest Scam : निवृत्त कोषागार अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत १४ लाखांचा गंडा

दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती; ५ जणांवर गुन्हा दाखल
Digital arrest scam
Digital Arrest Scam : निवृत्त कोषागार अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत १४ लाखांचा गंडाPudhari File Photo
Published on
Updated on

Retired Treasury Officer Swindled of ₹14 Lakhs in 'Digital Arrest' Scam

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद्यांशी संबंध असून, मुंबईत गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत शहरातील पवननगर भागातील एका निवृत्त कोषागार अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी दोन दिवस 'डिजिटल अरेस्ट' करून १४ लाख १५ हजार रुपयांना लुटले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Digital arrest scam
Digital Arrest : निवृत्त प्राध्यापकाचे ३२ लाख हडपणाऱ्या दोन भामट्यांना बेड्या

शिवाजी संभाजीराव तुंबलवाड (वय ६७) असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना 'प्रिया मॅडम' नावाच्या महिलेचा आणि नंतर अमित चौधरी, संदीपराव, प्रदीप जयस्वाल यांचा फोन आला. त्यांनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून, "तुमच्या सिमकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी झाला आहे," अशी भीती घातली. कारवाईतून वाचण्यासाठी भामट्यांनी तुंबलवाड यांना सोने गहाण ठेवून 'गोल्ड लोन' काढायला लावले आणि १४ लाख १५ हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले.

त्यानंतर दोन दिवस त्यांना कुणाशीही संपर्क न करण्याचा दम देत घरातच 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक वसंत सप्रे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Digital arrest scam
Cyber Crime | निवृत्त शिक्षकाला खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकवून 97 लाखांची सायबर लूट

घाबरू नका; १९३० वर संपर्क साधा !

सध्या 'डिजिटल अरेस्ट'च्या माध्यमातून फसवणूक वाढली आहे. पोलिस कधीही व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत किंवा पैसे मागत नाहीत. असा फोन आल्यास न घाबरता तात्काळ स्थानिक पोलिस किंवा १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news