Mukhed Cooperative Election | मुखेड खरेदी-विक्री संघावर ‘बळीराजा’ पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय; आठ जागा बिनविरोध
Mukhed Kharedi Vikri Sangh Election
आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा’ पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. Pudhari
Published on
Updated on

Mukhed Kharedi Vikri Sangh Election

मुखेड : मुखेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा’ पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. निवडणुकीत पॅनलचे आठ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी उर्वरित सात जागांसाठी झालेल्या मतदानातही बळीराजा पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळविला. त्यामुळे खरेदी-विक्री संघावर बळीराजा पॅनलची एकहाती सत्ता आली आहे.

तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आमदार डॉ. तुषार राठोड आणि माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या गटात युती झाली. या युतीनुसार १५ पैकी नऊ जागा आमदार गटाला, तर सहा जागा माजी आमदार बेटमोगरेकर यांच्या गटाला देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार दोन्ही गटांनी एकत्रितपणे ‘बळीराजा’ पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.

Mukhed Kharedi Vikri Sangh Election
Nanded ATM card swap fraud arrest- एटीएममधून आले नाहीत पैसे, क्षणात कार्ड बदलून २८ हजार लंपास; आंतरराज्यीय सराईत आरोपीला अटक

जागावाटपानंतर पॅनलच्या आठ जागा बिनविरोध काढण्यात यश आले. त्यामुळे उर्वरित सात जागांसाठी २३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान झाले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत या सातही जागांवर बळीराजा पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. मतदारांनी विरोधी उमेदवारांना नाकारल्याने संघाच्या कारभाराची सूत्रे बळीराजा पॅनलकडे गेली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत पुढाकार घेतला. त्यांनी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्याशी चर्चा करून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये समन्वय साधत आठ जागा बिनविरोध काढण्यात यश मिळाले.

Mukhed Kharedi Vikri Sangh Election
Nanded News | शासन मंजुरी मिळाली; ढाणकीतील अप्पर तहसीलदार कार्यालय कधी सुरू होणार?

यापूर्वी आमदार डॉ. राठोड यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यात आला होता. आता खरेदी-विक्री संघावरही बळीराजा पॅनलच्या माध्यमातून भाजप समर्थक गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संबंधित सहकारी संस्थांवरील या विजयामुळे आमदार राठोड यांच्या ग्रामीण भागातील जनसंपर्काची चर्चा सुरू झाली आहे.

विजयी संचालक

आमदार गट : बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, डी. एस. गोपनर, विजयकुमार मस्कले, आनंदराव पाटील शिंदे, व्यंकटराव वाडीकर, अनुराधा कदम, चिमाताई गवते, जगन्नाथ तरगुडे आणि रमेश पडलवार.

Mukhed Kharedi Vikri Sangh Election
Nanded Congress Protest | हिमायतनगर तालुका दुष्काळ जाहीर करा; काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर गट : माधवराव पाटील उंद्रीकर, दत्ता पाटील बेटमोगरेकर, भानुदास पाटील भोसले, व्यंकटराव पाटील उमाटे, उज्वला पत्रे आणि बालाजी खांडेकर.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चव्हाण यांनी काम पाहिले. त्यांना होनराव आणि बेजगमवार यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news