Nanded civic politics : नांदेड मनपात आता अनेकांना लागले स्थायी समितीच्या सभापतिपदाचे वेध...

स्थायी समितीच्या सभापतींच्या पदावर अनेकांचा डोळा
Nanded civic politics
नांदेड मनपात आता अनेकांना लागले स्थायी समितीच्या सभापतिपदाचे वेध...File Photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांची निवड झाली, आता स्थायी समितीचे सदस्य आणि सभापती होण्यासाठी अनेकांना वेध लागले आहेत. स्थायी समितीचे सभापती हे ‌‘क्रीम‌’ पद असल्याने. स्थायी समितीच्या सभापतींच्या पदावर अनेकांचा डोळा आहे.

नांदेड महापालिकेत 81 पैकी, भाजपचे 45 सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट) चार सदस्य व एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने युतीचे संख्याबळ 50 वर गेली आहे. त्यामुळे स्थायी समितीतही युतीतील उमेदवारांचाच बोलबाला राहणार आहे. त्याच बरोबर काँग्रेस - वंचित 15, एमआयएम पक्षाचे 14 असे संख्याबळ आहे. त्यामुळे आगामी स्थायी समितीच्या सदस्य होण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. त्याच बरोबर स्थायी समितीचे सभापती पद मिळविण्यासाठी देखील अनेकांनी फिल्डींग लावल्याचे खात्रीलायक माहिती आहे. त्यापुर्वी स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांमधील कांहीजण महापौर,उपमहापौर पदाची संधी हुकली आता स्थायी समितीची तर लॉटरी आपल्याला लागेल का याची वाट पाहत आहेत. नांदेडच्या भाजपमध्ये भाजपचे नेते खा. अशोक चव्हाण म्हणतील ते अंतीम निर्णय असल्याने स्थायी समितीच्या सदस्य व सभापती होण्यासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य इच्छुक आहेत. कांही इच्छुकांनी माजी आ. तथा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्याकडे देखील कांहीनी इच्छा बोलून दाखवली आहे.त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्य व सभापती कडे कुणाची वर्णी लागेल हे लवकरच कळणार आहे.

Nanded civic politics
Workers union protest Latur : लातुरात जनरल कामगार संघटनेचा मोर्चा

महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर एका महिण्याच्या आत स्थायी समितीचे गठण करुन स्थायी समितीच्या सभापतींची निवड करणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने आता या निवड प्रक्रीयेला गती येणार आहे. अशोक चव्हाण सध्या दिल्लीत अधिवेशनात आहे. ते दिल्लीतून परतल्या नंतर या निवडप्रक्रीयेला वेग येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नांदेड महापालिकेवर साडेसहाशे कोटींचे कर्ज आहे. कर्जाचा डोंगर घेऊनच महापौर, उपमहापौरांना पालिकेचा कारभार हाकावा लागणार आहे. त्यात स्थायी समितीची महत्वाची भुमिका असते, त्यात विकास कामे निधी मंजूर करणे, प्रस्तावांना मंजूरी देण्याची प्रक्रियेत स्थायी समितीला अधिक अधिकार असल्याने स्थायी समितीचे गठण होऊन सभापती निवड झाल्यानंतर उपलब्ध निधीचे नियोजन करण्याच्या कामाला गती येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज होते.

स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य देखील सामिल असतात.सर्वांच्या समन्वयातून महापालिकेचा कारभार करावा लागतो. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद अनुभवी व्यक्तीकडे राहिले तर महापालिकेच्या कारभार सुरळीत चालू शकतो.याच अनुषंगाने भाजपला देखील अशा अनुभवी सदस्याला सभापती पदावर बसवावे लागणार आहे.

Nanded civic politics
Illegal ganja transport : सिमेंटच्या गोणीतून गांजाची तस्करी

दरम्यान, सत्तेत मित्रपक्षाला अद्याप कुठलेही पद मिळाले नसल्याने मित्रपक्षातील शिवसेना व अपक्ष असलेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या सदस्य पदी व सभापती पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असून, उघड समोर येऊन कुणीही इच्छा दाखवत नसल्याची आजची परिस्थिती आहे.

अशोक चव्हाण आल्यानंतर घडामोडींना येणार वेग

नांदेड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवड प्रक्रीया पुर्ण करुन अशोक चव्हाण हे दिल्लीला अधिवेशनासाठी गेले, आता यापुढे स्विकृत सदस्य निवड प्रक्रिया तसेच स्थायी समितीचे सदस्य, सभापती निवडीचे हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत. अशोक चव्हाण नांदेड मध्ये आल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहेत. त्यामुळे चव्हाण नांदेडला कधी येणार आहेत याकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news