Purna Adilabad Passenger Train Delay
Purna Adilabad Passenger Train DelayPudhari

Purna Adilabad Train | पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजरचा बोजवारा; रात्री ९.३० ऐवजी १.३० ला आगमन, प्रवासी संतप्त

Nanded News | वेळापत्रक कोलमडले; खासदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
Published on

Purna Adilabad Passenger Train Delay

हिमायतनगर : नांदेडवरून सुटणारी पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर रेल्वे गाडी सलग दोन दिवस मोठ्या उशिराने धावल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी ७.३० वाजता नांदेडहून सुटून रात्री ९.३० वाजता हिमायतनगर येथे पोहोचणारी गाडी तब्बल चार तास उशिराने धावली. मंगळवार व गुरुवारी ही गाडी रात्री सुमारे १.३० वाजता हिमायतनगर स्थानकावर दाखल झाली.

१२ फेब्रुवारी रोजी गुरुवारी संबंधित पॅसेंजर गाडी नांदेड स्थानकावरच रात्री ११.३० वाजता दाखल झाली. नियोजित वेळेपेक्षा प्रचंड उशीर झाल्याने प्रवाशांनी स्थानक कार्यालयात तक्रारी नोंदवल्या. नांदेडहून उशिरा सुटलेली गाडी हिमायतनगरसह इस्लापूर, बोधडी, किनवट ते आदिलाबादपर्यंतच्या प्रवाशांना रात्रभर प्रवास करण्यास भाग पाडत आहे.

Purna Adilabad Passenger Train Delay
Nanded Railway News | वर्धा–नांदेड रेल्वे मार्ग : उमरखेड–पुसदच्या विकासाची नवी दारे उघडणार

हिमायतनगर व परिसरातील अनेक नागरिक वैद्यकीय उपचार, शासकीय कामे व अन्य कारणांसाठी नांदेडकडे रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे वेळेवर येते या विश्वासाने प्रवासी वेळेआधीच स्थानकावर पोहोचतात; मात्र सलग दोन दिवस गाडी उशिरा धावल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत थांबावे लागल्याने गैरसोय वाढली.

प्रवाशांची प्रतिक्रिया

“नांदेडहून गाडी सात वाजता सुटणार म्हणून आम्ही वेळेत स्टेशनवर पोहोचलो. मात्र गाडी अकरा वाजता आली आणि हिमायतनगरला रात्री दीड वाजता पोहोचली. लहान मुलांसह प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकानुसार गाडी धावेल याची काळजी घ्यावी,” अशी प्रतिक्रिया अमोल कोटुरवार (रा. हिमायतनगर) यांनी दिली.

Purna Adilabad Passenger Train Delay
Nanded Railway News | बासर–नवीपेठ रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी ७ दिवस वाहतूक विस्कळीत

खासदारांनी लक्ष द्यावे

नांदेड जिल्ह्यातील चारही खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून वेळापत्रकानुसार गाड्या धावतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजरचे वेळापत्रक तातडीने सुरळीत करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news