Cannabis Seized : किनवट तालुक्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारात एका शेतात छापा टाकला.
Nanded News
Nanded News : किनवट तालुक्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on: 
Updated on: 

Police raid on cannabis farm in Kinwat taluka; Assets worth lakhs seized

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारात एका शेतात छापा टाकला. कापूस व मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून लावलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिसांनी १८ किलो ४८० ग्रॅम वजनाचा तब्बल ९ लाख २४ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असून, एका शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Nanded News
Nanded News : हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली चालुक्य कालीन येरगी

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव केंद्रे आणि त्यांच्या पथकाने सिंगरवाडी (ता. किनवट) येथील शेत गट क्रमांक ४२ वर अचानक कारवाई केली. या कारवाईत नायब तहसीलदार तथा राजपत्रित अधिकारी बालाजी फोले, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) टीम उपस्थित होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेतमालक दत्ता खंड जाधव (३५, रा. सिंगरवाडी) याने आपल्या शेतात कापूस आणि मिरची पिकाच्या आडोशाने गांजाची बेकायदेशीर लागवड केली होती. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर केलेल्या मोजमापात एकूण २६ लहान-मोठी हिरवी गांजाची झाडे सापडली, ज्यांचे वजन १८ किलो ४८० ग्रॅम भरले. याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Nanded News
Nanded News : नांदेडमध्ये दुष्काळी कामांना गती; रोहयोच्या कामांवर १२ हजार मजूर !

अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम तीव्र राहणार

जिल्ह्यात कोणत्याही भागात बेकायदेशीर अंमली पदार्थांची लागवड, साठा किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधातील अशी कठोर कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.